Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक यामुळे टेस्लाला २ कोटीच्या १ लाख ५८ हजार कार फॅक्टरीत परत घ्यावा...

यामुळे टेस्लाला २ कोटीच्या १ लाख ५८ हजार कार फॅक्टरीत परत घ्यावा लागणार!

Related Story

- Advertisement -

टेस्ला (Tesla Inc) कंपनीने २ कोटीच्या १ लाख ५८ हजार कार फॅक्टरीत परत मागवणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे अमेरिकेतली टेस्लाकंपनीला मोठा झटका बसला आहे. Tesla Incच्या २०१२-२०१८ च्या मॉडेल-एस (Model-S) आणि २०१६-२०१८च्या मॉडेल-एक्स (Model-X)च्या मीडिया कंट्रोल युनिटच्या बिघाडी मिळल्यानंतर NHTSAने हे कार परत मागवण्याचे कंपनीला आदेश दिले आहेत. NHTSAने सांगितले आहे की, ‘मीडिया कंट्रोल युनिटच्या बिघाडीमुळे टचस्क्रीन काम करत नाही आहे. ज्यामुळे लोकांच्या सुरक्षेतेला धोका निर्माण होऊ शकतो.’

सामान्यतः रस्त्यावरील सुरक्षा नियामक चिंता व्यक्त केल्यानंतर कंपन्या स्वतः गाड्या परत मागवतात. रॉयटर्सच्या वृत्ताच्या माहितीनुसार, ही असाधारण घटना आहे की, NHTSAच्या अधिकारी पत्र लिहून कंपनीकडून कार रिकॉल करण्यासाठी सांगावे लागत आहे. Teslaने यावर तातडीने उत्तर दिले नाही आहे, परंतु २७ जानेवारीपर्यंत NHTSAने यावर उत्तर मागितले आहे.

- Advertisement -

रस्ता सुरक्षा नियामक NHTSAने नोव्हेंबरमध्ये वाहनाच्या तपासणीनंतर Teslaला हे पत्र लिहिले होते. तपासाच्या तात्पुरत्या निकालात NHTSAने कंपनीच्या दोन मॉडेलमध्ये मीडिया कंट्रोल युनिट आणि या कारणामुळे टचस्क्रीन काम करत नाही नसल्याचे व्यक्त केले होते.

NHTSAने म्हटले आहे की, ‘टचस्क्रीन खराबीमुळे अनेक सुरक्षा संबंधित समस्या उद्भवू शकतात. पुढील आणि मागच्या कॅमेराचा व्ह्यू दिसणे महत्त्वाचे आहे. टचस्क्रीन खराबीमुळे सुरक्षा प्रणाली बाधित होऊ शकते, ज्यामुळे ड्रायव्हिंग करताचा चालकाला समस्या उद्भवू शकते. तसेच यामुळे कार क्रॅश होण्याचा धोका वाढू शकतो.’


- Advertisement -

हेही वाचा – Jio ने बंद केले त्यांचे स्वस्तातले ‘हे’ चार प्लान; जाणून घ्या


 

 

 

- Advertisement -