घरटेक-वेकआता Redmi 8 खरेदी करू शकता फक्त २९९ रूपयात!

आता Redmi 8 खरेदी करू शकता फक्त २९९ रूपयात!

Subscribe

एक्सेंज किंमत मिळाल्यानंतर ग्राहकांना हा फोन २९९ रूपयांत खऱेदी करता येणार

स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ने ५ हजार एमएच बॅटरी असणारा रेडमी ८ हा स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची किंमत ७ हजार ९९९ रूपये इतकी होती. हा फोन रेडमी ७ चा अपग्रेडेड व्हेरिएंट फोन असून भारतीय बाजारात या फोनची स्पर्धा Realme 5 आणि Samsung Galaxy M20 शी असणार आहे. या स्मार्टफोनचा सेल आज दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार असून ई-कॉमर्सच्या तसेच कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असणार आहे.

अशी असेल Redmi 8 किंमत

या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटला खरेदी करता येऊ शकते. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असणारा फोन ७ हजार ९९९ रूपयात तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणारा फोन ८ हजार ९९९ रूपयांत खरेदी करता येणार आहे. असे दोन्ही व्हेरिएंटचे फोन एमेरल्ड ग्रीन, ऑनिक्स ब्लॅक, रूबी रेड आणि सैफायर ब्लू रंगात उपलब्ध आहेत.

- Advertisement -

असा खरेदी करता येणार फक्त २९९ रूपयात फोन

सेल सुरू झाल्यावर ग्राहकांना हा फोन खरेदी करताना Flipkart Axis Bank Buzz Credit Card चा वापर करून खरेदी केला तर ५ टक्के सवलत मिळू शकते. तसेच हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर ही खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय ७ हजार ७०० रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. ही एक्सेंज किंमत मिळाल्यानंतर ग्राहकांना हा फोन २९९ रूपयांत खऱेदी करता येणार आहे.

असे आहेत Redmi 8 चे वैशिष्ट्य

  • ६.२ इंच असणारा एचडी प्लस डिस्प्ले
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर
  • इंटरनल स्टोरेज ५१२ जीबीपेक्षा अधिक
  • गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन
  • ड्यूल रियर कॅमरा
  • ५००० एमएएचची बॅटरी, १८ W फास्ट चार्जिंग सपोर्ट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -