‘या’साठी अनुराग कश्यपने डिलीट केले ट्विटर अकाऊंट

सोशल मीडियावरील ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपने स्वत:चे ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे.

Mumbai
दिग्दर्शक अनुराग कश्यप

सोशल मीडियावरील ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्याचे स्वत:चे अधिकृत ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे. हे अकाऊंट डिलीट करणापूर्वी अनुरागने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी ट्विटर अकाऊंट डिलीट का केले आहे. त्याची कारणे लिहीली आहेत.

का केले अनुरागने ट्विटर अकाऊंट डिलीट

अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिलेल्या अनुरागच्या आई – वडिलांना आणि मुलाला सतत धमकीचे फोन आणि मेसेज येत होते. सतत धमकीचे फोन येत असल्यामुळे अनुरागने ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाला अनुराग?

ज्यावेळी तुमच्या आई – वडिलांना धमकीचे फोन येतात आणि मुलीला ऑनलाईन धमकी मिळते, त्यावेळी कोणीही बोलायला तयार होत नाही. उघडपणे कोणीही त्याविषयी काही सांगत देखील नाहीत. मात्र, अस करण्यामागे कोणतेही कारण नसते. कारण हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत होईल. त्यामुळे सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा‘, असं अनुरागने म्हटले आहे.

अनुरागचे अखेरचे ट्विट

अनुरागने दुसरे ट्विट केले आहे. त्यात तो म्हणाला आहे की,’तुम्हा सगळ्यांना यश आणि सुख मिळावे ही इच्छा आहे. हे माझे अखेरचे ट्विट आह. कारण मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलतच नाही. यामुळे मी माझ अकाऊंट बंद करत आहे. गुड बाय‘.

ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टपणे विचार मांडणारा अनुराग अनेक वेळा त्याच्या वक्तव्यांमुळे ट्रोल होत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने जम्मूकाश्मीरबाबतच्या ३७० कलम हटवण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले होते. कलम ३७० हटवण्याचे काम ज्या पद्धतीने करण्यात आले आहे ते भीतीदायक असून चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे, असे त्याने म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यावरुन त्याच्यावर अनेक स्तरांमधून टीका करण्यात आली होती.


हेही वाचा – नेटफ्लिक्सवर अनुरागच्या ‘सेक्रेड गेम्स’चा थरार!

हेही वाचा – ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री दिसणार सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here