प्रसिद्धीसाठी मॉडेलनं चेहऱ्याचं वाटोळं केलं; आधीचा फोटो पाहून म्हणाल ‘काय होतीस तू’

प्रसिद्धीसाठी या मॉडेलने आपल्या गालावर सर्जरी करुन घेतली

आपलं वेगळंपण दाखविण्यासाठी हल्ली कोणत्याही स्तराला जाण्याचा ट्रेंड सेट झालाय. विशेषतः इन्स्टा, युट्यूब आणि इतर सोशल मीडिया साईटवर आपलं वेगळंपण दाखविण्यासाठी काहीजण चेहरा, शरिराची राखरांगोळी करतात. पण त्यांना लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्सची पडलेली असते. अन त्यातून पैसे कमविण्याची. युक्रेनमधील एका मॉडेलची अशीच चर्चा रंगलीये. या मॉडेलने आपल्या सुंदर चेहऱ्यावर इतके प्रयोग केलेत की, तिचा आधीचा फोटा पाहीला की तुम्हाला हळहळ वाटेल आणि तुमच्या तोंडून शब्द बाहेर पडतील “काय होतीस तू, काय झालीस तू”

युक्रेनच्या या ३० वर्षीय मॉडेलचे नाव आहे Anastasia Pokreshchuk. तिच्या नावाप्रमाणेच तिचा कारनामा देखील अवघडच म्हणावा लागेल. ‘माझे गाल जगातील सर्वात मोठे आहेत’, असा दावा ही करते. पण एवढ्यावरच तिचं मन भरलेलं नाही. तिला आता आणखी मोठे गाल हवे आहेत. त्यासाठी ती अजून इंजेक्शन घेणार आहे. Anastasia म्हणते, “तुम्हाला माझे गाल मोठे वाटत असतील, पण ते छोटे आहेत. येत्या काही दिवसांत ते आणखी मोठे होतील.”

चार वर्षांपूर्वी Anastasia ने गाल मोठे करणारे पहिले इंजेक्शन घेतले होते. त्यानंतर ती झपाटल्यासारखी गालाच्या पाठी लागली. तिने आतापर्यंत १६०० युरो म्हणजे जवळपास १ लाख ४० हजारांपर्यंतची रक्कम गाल मोठे करण्यात घालवली आहे. “जेव्हा मी पहिले इंजेक्शन घेतले तेव्हा मला वाढलेले गाल पाहून खूप आनंद झाला. त्यामुळेच मी आणखी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले.”, अशी प्रतिक्रिया तिने न्यू यॉर्क पोस्टला दिली आहे.

Anastasia एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने ओठांवरही प्रयोग केले आहेत. तसेच शरिराच्या इतर भागांवर देखील आपण ट्रिटमेंट करणार असल्याचे ती सांगते. तिच्या अगडबंब स्टाईलवर लोक काय विचार करतात? याचा तिला काहीही फरक पडत नाही. ती म्हणते मला माझ्या शरिरासोबत जे करायचे ते मी करणार, माझे शरिर आहे. बरं हे सर्व ती ज्या मॉडेलिंगसाठी करतेय, त्यातही फारशी प्रगती नाही. तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहेत. एवढे फॉलोअर्स तर भारतात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडेही असतात.

चला तर आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. या मॉडेलचा आधीचा चेहरा. खालील फोटोमध्ये आधीचा आणि नंतरचा फोटो दिलेला आहे. आता तुम्हीच बघा…

Before आणि After