घरट्रेंडिंग'गब्बर को किस बात की मिली सजा'; जनजागृतीसाठी UP पोलिसांचं भन्नाट ट्वीट...

‘गब्बर को किस बात की मिली सजा’; जनजागृतीसाठी UP पोलिसांचं भन्नाट ट्वीट व्हायरल

Subscribe

या भन्नाट ट्वीटला अनेकांनी पसंती दिली असून त्यांच्या सर्जनशीलतेचे नेटिझन्सकडून कौतुक करण्यात येत आहे.

डिजिटलायझेनच्या युगात जुळवून घेताना, सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर मुंबई पोलिसांनी केला. मुंबई पोलीस नेहमी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कोरोनाकाळात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी चित्रपटातील कलाकारांसह सिनेमाच्या पोस्टरचा वापर करून नागरिकांची जनजागृती केली. दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. सरकारसह प्रशासनही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.

अशापरिस्थितीत मुंबई पोलिसांप्रमाणे उत्तर प्रदेश पोलिसांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून १९७५ साली प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडमधील सुपरहीट चित्रपट शोलेतील एका सीनची मदत घेतली. उत्तर प्रदेश पोलिसांनी या सीनची मदत घेत ‘गब्बर को किस बात की मिली सजा’ असे कॅप्शन दिले आणि हा शोले चित्रपटातील सीन शेअर केला.

- Advertisement -

असं आहे व्हायरल होणारं ट्वीट

या व्हायरल होणाऱ्या ट्वीटमध्ये अमजद खान यांनी साकारलेले गब्बर हे पात्र उघड्यावर थुंकताना दाखवलं आहे. तर या चित्रपटातील ठाकूर यांची भूमिका साकारणारे संजीव कुमार हे त्याला गळा दाबून पकडताना दाखवण्यात आले आहे. व्हिडिओच्या शेवटी एक संदेशही देण्यात आला आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविड १९ चा प्रसार वाढू शकतो. हा एक गुन्हा आहे.’ या ट्विटच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे अवाहन उत्तर प्रदेश पेलिसांकडून करण्यात आले आहे. या भन्नाट ट्वीटला अनेकांनी पसंती दिली असून त्यांच्या सर्जनशीलतेचे नेटिझन्सकडून कौतुक करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -