Video: चोरी केलेले सामान अंतर्वस्त्रात लपवले; पण CCTV मध्ये सर्व दिसले

woman was spotted on CCTV
सीसीटीव्ही व्हिडिओ मधील चित्र

रशियाच्या क्रासनोडार (Krasnodar, Southern Russia) शहरातील एका सुपर मार्केटमध्ये विचित्र प्रकार घडला. या प्रकाराचा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होतोय. सुपरमार्केटमध्ये आलेली एक महिला आपल्या कपड्यांच्या आत दुकानातील सामान चोरून लपवत असल्याचे दिसत आहे. सुपरमार्केटच्या सीसीटीव्हीमध्ये या बाईची करामत कैद झालेली आहे. ही घटना ५ ऑक्टोबरची आहे. मात्र याचा व्हिडिओ आता जगभरात व्हायरल झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, ही महिला मोठ्या चलाखीने वस्तू झटपट आपल्या अंतर्वस्त्रात लपवतेय. चोरी करत असताना इतरही ग्राहक दुकानात दिसत आहेत. मात्र त्यांचं लक्ष सामान खरेदी करण्याकडे असल्यामुळे त्यांना या महिलेची हातसफाई दिसून येत नाही. समोर फिरणारा ग्राहक दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाताच ही महिला पुन्हा आपली हातसफाई सुरु करते. व्हिडिओमध्ये दिसतंय की या महिलेने सहा वस्तू आपल्या कपड्यांत लपविल्या आहेत.

सुपर मार्केटच्या सिक्युरीटी प्रमुखाने हा व्हिडिओ बघितल्यानंतर संताप व्यक्त केला. तसेच या दुकानाच्यावतीनेच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. सिक्युरिटी प्रमुखाने सांगितले की, “असे व्हिडिओ जगासमोर आले पाहीजेत. ही लोकं किती हीन प्रवृत्तीचे आहेत, याचे दर्शन जगाला व्हायला हवे. अशा लोकांना बेशरम असा एकच शब्द आपण वापरू शकतो”. अशा कडक शब्दांत सिक्युरिटी प्रमुखाने आपली नाराजी व्यक्त केली.

नेटीझन्सला मात्र वेगळीच चिंता सतावत आहे. व्हिडिओमध्ये ही महिला चोरी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र तिने टाईट ड्रेस घातलेला आहे. ती सहा वस्तू चोरते. तरी ते सामान दिसत कसे नाही? असे प्रश्न काही लोकांना पडले आहेत, असो. क्रासनोडार पोलिसांनी मात्र या चोर महिलेचा शोध सुरु केला आहे.