घरट्रेंडिंगसावधान! 'या' घटकांमुळे प्रजनन क्षमतेवर अनिष्ट परिणाम

सावधान! ‘या’ घटकांमुळे प्रजनन क्षमतेवर अनिष्ट परिणाम

Subscribe

हवा आणि जमिनीतील काही घटकांच्या तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतोय! हे जर तुम्हाला कुणी सांगितले तर तुम्ही काय म्हणाल? पण, हे सत्य आहे. महिला आणि पुरूष या दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर काही अनिष्ट परिणाम होत असल्याचे अमेरिकेतल्या कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. निसर्गात असलेल्या लेडचा (धातू) मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो का?

कसा होतो परिणाम?

- Advertisement -

पाण्यात देखील लेडचा अंश आढळतो. शिवाय मातीमध्ये देखील लेड असते. लेड हे नैसर्गिक विष आहे. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम हा आपल्या प्रजनन क्षमतेवर होतो. १५ ते ४४ वयोगटातल्या पुरूष आणि स्त्रीयांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला हवा आणि मातीमध्ये असलेला लेड कमी कशा पद्धतीने करता येईल? किंवा त्यावर नियंत्रण कसे मिळवता येईल यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

१९७८ ते १९८८ दरम्यान हवेत निर्माण झालेल्या लेडवर नियंत्रण मिळवले गेले होते. त्यामागील प्रमुख कारण होते युनाईटेड स्टेटने तयार केलेला क्लिन एअर अॅक्ट! पण २००० सालानंतर मात्र हवेतल्या लेडचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे त्याचा परिणाम आता प्रजनन क्षमतेवर होताना दिसतो आहे.

- Advertisement -

वेगाने होणारे ग्लोबलायझेशन! त्याच वेगाने वाढणारे प्रदुषण. या साऱ्याचा परिणाम हा सध्या माणसाच्या शरीरावर होताना दिसून येत आहे. परिणामी दिवसागणिक मानवी आरोग्यांच्या समस्या देखील वाढत आहेत. अनेकवेळा हवा, पाणी, अन्नाद्वारे शरीराला नको असलेले घटक हे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्याचा परिणाम हा आरोग्यावर होतो. आताच्या संशोधनातून समोर आलेली बाब याचेच एक उदाहरण आहे. त्यामुळे आगामी काळात विकास साधताना मानवी आरोग्याबाबत देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे. या संशोधनाला अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागला नसल्याचेही कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक कॅरेन क्ले यांनी या अहवालात नमूद केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -