आठ वर्षाचा रेयान यू-ट्यूबमधून कमावतो करोडो रुपये!

यू-ट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत एक ८ वर्षीय मुलगा टॉपवर आहे. त्याच्या व्हिडिओंना यू-ट्यूबवर सर्वाधिक पसंती मिळत आहे.

youtube stars of 2019 know about ryan kaji who earned 184 crores in one year from youtube
आठ वर्षाचा रेयान यू-ट्यूबमधून कमावतो करोडो रुपये

हल्ली सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता त्याद्वारे अर्थार्जनाचा देखील मार्ग मोकळा झाला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत स्वतःचे यू-ट्यूब चॅनल्स सुरु करत अर्थाजर्नाचा दुसरा मार्ग अवलंबला आहे. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधत आहे तो म्हणजे आठ वर्षाचा एक मुलगा. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की, यू-ट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत एक ८ वर्षीय मुलगा टॉपवर आहे. त्याच्या व्हिडिओंना यू-ट्यूबवर सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या मिलियन व्हिव्जमधून या लहानग्याने करोडो रुपये कमावले आहेत.

कोण आहे तो मुलगा?

यू-ट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या त्या ८ वर्षीय मुलाचे नाव रेयान काजी आहे. तो चीनमध्ये राहतो. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, रेयानने २०१९ मध्ये २६ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल १८४ कोटी रूपये कमावले आहेत. विशेष म्हणजे, फोर्ब्स या मासिकाने सुद्धा टॉप यू-ट्यूबर्सच्या यादीत रेयानलाच सर्वोच्च स्थानी ठेवले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये यू-ट्यूब द्वारे कमाई करणाऱ्यांच्या यादीत रेयानने टॉपची जागा मिळवली आहे. २०१८ मध्ये सुद्धा या यादीत रेयानचेच नाव सर्वप्रथम होते.

रेयानचा यू-ट्यूब चॅनल

यू-ट्यूबवर रेयानचा रेयान्स वर्ल्ड नावाचा एक चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून रेयान खेळण्यांसोबत खेळतो. एवढेच नाही तर विविध खेळण्यांचे तो परीक्षण सुद्धा करतो. २०१५ मध्ये या चॅनेलची सुरुवात झाली. रेयानच्या या चॅनेलचे २३.२ मिलियन सब्स्क्राइबर आहेत. विशेष म्हणजे काही तासातच रेयानच्या चॅनेलला लाखोंचे व्हिव्हर्स मिळतात. ज्या पद्धतीने रेयान खेळण्यांसोबत खेळतो आणि त्यांचे परीक्षण देतो. त्याचा हा अंदाज नेटकऱ्यांना प्रभावित करतो.