घरमहाराष्ट्रआता १० रुपयात जेवण देणार, मग ५ वर्ष झोपा काढत होता का?...

आता १० रुपयात जेवण देणार, मग ५ वर्ष झोपा काढत होता का? अजित पवार

Subscribe

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना १० रुपयात जेवण देण्याची घोषणा केली होती. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “पाच वर्ष झोपा काढल्या का? आज त्यांना निवडणुकीच्या तोंडावर १० रुपये थाळी देण्याचे सुचत आहे का? यांना खरंच काय करायचे असते तर त्यांनी पाच वर्षात केले असते.”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

उद्धव ठाकरेंनी युती टीकेल हे तपासावं

“मी कसाय ते लोकांना माहितीये, माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तापासायचे काम उध्दव ठाकरे कधीपासून करायला लागले? ज्योती कसे टिकेल हे ठाकरे यांनी पहावं””या सरकारने पाच वर्षात काय केले ते सांगावे. माझे अश्रू काय आहेत, हे तपासण्याचे काम उद्धव ठाकरेंनी करु नये, त्यापेक्षा युतीकशी टीकेल हे तपासावे. मी काही रडणारा किंवा पळून जाणारा माणूस नाही. मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही म्हणून तसे घडले.

- Advertisement -

विलिनीकरणापेक्षा आमचे लक्ष्य विधानसभा जिंकण्याचे

सुशीलकुमार शिंदे यांनी वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना जे वाटतं ते त्यांनी व्यक्त केले. सध्या आमच्यासमोर विधानसभा निवडणुकीत १७५ जागा निवडून आणण्याचे आवाहन आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर बोलून वेगळ्या विषयावर चर्चा न्यायची नाही. या प्रकरणावर आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात भूमिका व्यक्त करतील.

भाजप पक्ष सध्या कलम ३७० वर बोलत आहे. ज्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित नाही. इथे बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांसारखे अनेक प्रश्न असून त्यावर हे बोलत नाहीत. जातीयवाद उफाळतो त्यावर बोलत नाहीत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे मी कायम सांगत आलो. आता कांद्याला पैसे मिळायला लागले तर लगेच निर्यात बंदी केली, असा आरोपही अजित पवार यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -