घरमुंबईघरवापसी! भास्कर जाधव यांनी बांधले शिवबंधन

घरवापसी! भास्कर जाधव यांनी बांधले शिवबंधन

Subscribe

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या कोकणातील गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आज, शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती त्यांनी शिवबंधन बांधले. राष्ट्रवादीचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. भास्कर जाधव हे आज, शुक्रवारी सकाळीच औरंगाबाद येथे पोहोचले. तिथे त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते मुंबईसाठी रवाना झाले.

भास्कर जाधव यांची घरवापसी, हाती बांधले शिवबंधन!

भास्कर जाधव यांची घरवापसी, हाती बांधले शिवबंधन!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 13, 2019

- Advertisement -

काय म्हणाले भास्कर जाधव

मी राष्ट्रवादी सोडली मात्र त्यांच्याशी माझे कोणतेही भांडण नाही. मी मूळचा शिवसैनिक आहे. त्यामुळे माझा मूळ स्वभाव मला स्वस्त बसू देत नव्हता. त्या काळात माझ्याकडून समज-गैरसमज झाले होते. पण आता सर्व समज-गैरसमज दूर झालेले आहेत. मला माझी अंतरात्मा शांत बसू देत नव्हती. उद्धव ठाकरे यांनी माझी अंतरात्मा ओळखली. ज्या वेळेला मी शिवसेना सोडली त्यांच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे पक्ष सोडली, अशा चर्चा होऊ लागल्या. मात्र मी कधीही असा आरोप केला नाही. मी कधीच मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत कधीही टीका केली नाही, हे भास्कर जाधव यांनी शिवबंधन बांधल्यानंतर स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी केले स्वागत

भास्कर जाधव हे एक लढवय्या शिवसैनिक आहेत. ते शिवसेना पक्षात परत येत आहेत, असे म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना शिवबंधन बांधले. ज्याप्रमाणे तुम्ही १५ वर्षांपूर्वी शिवसेनेत असताना नागरिकांच्या हिताची बाजू लावून धरली तसेच यापुढेही कराल, ही आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -