घरट्रेंडिंगकल्याणचा गली बॉय; पत्रीपूलावरुन तरुणाचा भन्नाट रॅप

कल्याणचा गली बॉय; पत्रीपूलावरुन तरुणाचा भन्नाट रॅप

Subscribe

कल्याणच्या एका रॅपरने पत्रीपुलावर भन्नाट रॅप बनवला आहे. या रॅपमध्ये त्याने दररोज पत्रीपुलावरुन जातांना कल्याणकरांना होणाऱ्या त्रासाचे अत्यंत मार्मिकपणे भाष्य केले आहे.

पत्रीपुलाचा त्रास आता असह्य झाला आहे. तरीदेखील प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. कल्याणकरांसाठी पत्रीपूल हा अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला आहे. यातूनच कल्याणच्या एका संवेदनशील रॅपरने पत्रीपुलावर भन्नाट रॅप बनवला आहे. या रॅपमध्ये त्याने दररोज पत्रीपुलावरुन जातांना कल्याणकरांना होणाऱ्या त्रासाचे अत्यंत मार्मिकपणे भाष्य केले आहे. ‘स्टेट्यून’ या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. व्हिडिओमध्ये हा रॅपर आपली ओळख ‘रवी जी म्युजिक’ अशी सांगत आहे. रॅपरने कल्याणकरांच्या व्यथा अत्यंत चोखपणे मांडले आहेत. रॅपच्या माध्यमातून त्याने सरकारवर देखील टीका केली आहे. स्मार्ट सिटीचे भाष्य करणारे पत्रीपूल कधी बनवणार? अला सवाल रॅपरने केला आहे. या रॅपचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा – कल्याणकरांची पत्रीपूलाला श्रद्धांजली

- Advertisement -

काय आहे रॅपमध्ये?

वर्षभरापासून कल्याणचे पत्रीपूलाचे काम सुरु आहे. मात्र, अध्यापही या पत्रीपूलाचे काम पूर्ण झालेले नाही. या पत्रीपूलामुळे दररोज लाखो लोकांना वाहतूक कोडींच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. पत्रीपूल लवकर तयार व्हावा यासाठी कल्याणमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे आंदोलनही झाले. याशिवाय मनसे देखील विभक्त असे आंदोलन केले. मात्र, तरीही पत्रीपुलाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्याला कंटाळून अनेक प्रवासी पत्रीपूल येथे रिक्षाखाली उतरुन पायी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातात. या सर्व गोष्टी रॅपमध्ये योग्य पद्धतीने मांडण्यात आले आहे.

तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा खोळंबा

पत्रीपूल पाडल्यानंतर ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत शेजारील एका पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने प्रचंड वाहतूक केांडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. कल्याणचा पत्रीपूल हा कल्याण डोंबिवली शहरांना जोडणारा असला तरीसुध्दा भिवंडी -कल्याण शीळ हा रस्ता प्रामुख्याने कल्याणच्या पत्रीपूलावरून जातो. त्यानंतर हा रस्ता पुढे नवी मुंबई, तळोजा, पनवेल, मुंबई, नाशिक महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा खोळंबा पत्रीपूलावर सहन करावा लागत आहे. दररोजच्या वाहतूक केांडीला सर्वसामान्य नागरिक वाहनचालक कंटाळले आहेत. कल्याण पत्रीपूलावरील वाहतुकीमुळे शहरातील विविध भागात आणि चौकातही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अंतर्गत वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. पत्रीपूलावरील खड्ड्यांमुळे एका नागरिकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पत्रीपूलाच्या वाहतूककेांडीमुळे मोर्चे, आंदोलन केली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘पत्रीपूल नव्हे एप्रिल फूल’; गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सरकारवर टीका

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -