जनता दल सेक्युलर ९ जगांवर निवडणूक लढवणार

Ichalkaranji
Janata Dal secular party will participate in 9 constituency in assembly election 2019
जनता दल सेक्युलर ९ जगांवर निवडणूक लढवणार

महाराष्ट्र प्रदेश जनता दल सेक्युलर पक्षाने विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. जनता दल सेक्युलरचे ९ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. जनता दल सेक्युलरच्या वतीने या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. दरम्यान, ‘महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप महायुतीचा पराभव झाला पाहिजे, ही जनता दलाची भूमिका आहे. त्यासाठी लोकशाही आणि पुरोगामी पक्षांची महाआघाडी व्हावी, या भूमिकेतून जनता दल आघाडीच्या वाटाघाटीमध्ये सहभागी होता. मात्र, सन्मानजनक निर्णय न झाल्यामुळे जनता दलाने आपले प्रभावक्षेत्र असलेल्या मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य जागी महायुतीला पराभूत करू शकतात, अशा समर्थ उमेदवारांना पाठिंबा देण्यात येईल’, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश जनता दलाच्या वतीने अध्यक्ष शरद पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे आणि मुंबई विभागीय अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी जाहीर केली.

‘या’ उमेदवारांची नावे जाहीर

१. लोहा – सौ. रुक्मिणी गीते

२. नायगांव – डॉ. सुरेश कदम

३. मालाड (प) – सौ. विद्या नाईक

४. आंबेगांव – नाथा शेवाळे

५. परांडा – एड. रेवण भोसले

६. चंदगड – सौ. स्वाति कोरी

७. मिरज (अजा) – सदाशिव खाडे

८. खानापूर – आबा सागर

९. जत – कृष्णदेव गायकवाड


हेही वाचा – धक्कादायक! राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद