घरमहाराष्ट्रधक्कादायक! राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद

धक्कादायक! राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड मतदारसंघातील अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात फक्त राष्ट्रवादीच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रणांगणातून बाहेर पडला आहे. आता राष्ट्रवादी चिंचवड मतदारसंघात कुणाला पाठिंबा देईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांना पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे. त्यांच्यासोबतच शंकर पांडुरंग जगता, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनश्याम परदेशी, प्रकाश भाऊराव घोडके अशा चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याचे कुंभार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – फलटणची उमेदवारी मीच नाकारली – दिपक निकाळजे

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

विधानसभा निवडणुकासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख संपुष्टात आली आहे. निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांसाठी २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. यानंतर ५ ऑक्टोबर रोजी सर्व अर्जांची छाननी होणार होती. त्यानुसार ५ ऑक्टोबर म्हणजे आज राज्यभरातील उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. या छाननीत चिंचवड येथील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाने शितोळे यांना एबी फॉर्म न दिल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यामुळे प्रशांत शितोळे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना नवी मुंबईत अपघात; तिघे किरकोळ जखमी

- Advertisement -

शेवटच्या दोन दिवसांत केला होता चिंचवडचा उमेदवार निश्चित

उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस बाकी असताना देखील राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा पिंपरी आणि चिंचवड येथील जागांचा तिढा सुटला नव्हता. अखेर दोन दिवसांअगोर सुलक्षणा शिलावंत आष्टी यांची पिपंरी तर प्रशांत शितोळे यांची चिंचवड मतदारसंघासाठी निवड करण्यात आली. दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्यामुळे प्रशांत शितोळी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे.

हेही वाचा – आरेतील झाडांवर रात्रीच्या काळोखात कुऱ्हाड; पर्यावरणप्रेमींचा संताप, पोलिसांनी केली धरपकड

शिवसेनेच्या बंडखोर नेत्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा?

प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रकारचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. चिंचवड मतदारसंघात शिवेसेनेचे गटनेता राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक शितोळे यांना एबी फॉर्म न दिल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी खरच राहुल कलाटे यांना पाठिंबा देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, शुक्रवारी चिंचवड मतदारसंघात १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले. त्यांची छाननी आज सुरु आहे.

हेही वाचा – शिवसेनेच्या पालकमंत्र्यापेक्षा आमदार धनवान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -