घरमहाराष्ट्रशिवसेनेचा जन्म हिंदुत्वासाठी नाही तर मराठी माणसांसाठी झाला होता - नवाब मलिक

शिवसेनेचा जन्म हिंदुत्वासाठी नाही तर मराठी माणसांसाठी झाला होता – नवाब मलिक

Subscribe

शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला होता. मात्र भाजपसोबत गेल्यामुळे शिवसेना कुठेतरी पथभ्रष्ट झाली. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडीचे सरकार बनणार आहे. महा विकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन रयतेचे राज्य निर्माण करेल. एक आदर्श सरकार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी देईल, अशी अपेक्षा नवाब मलिक यांनी व्यक्त केली. तसेच आतापर्यंत भाजपचे चाणक्य आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले जात होते. मात्र महाराष्ट्राने दाखवून दिले की, महाराष्ट्राचा चाणक्यच सर्वांवर भारी पडतो.

आज सकाळी सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय आला. हंगामी अध्यक्षच बहुमताची चाचणी करेल, हे समजल्यानंतर भाजपचा फोडाफोडीचा डाव फसला असल्याचा आरोप मलिक यांनी केला. कालपर्यंत आमच्याकडे १६२ आमदार नाहीत, असे सांगणारे भाजपचे लोक आता तोंडावर पडले आहेत. अजित पवारांचा व्हिप चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

#Live : ८० तासांत सरकार पडल्यानंतर महा विकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरु

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ನವೆಂಬರ್ 26, 2019

सहा महिने नाही तर पाच पाढ म्हणणार 

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतल्यानतंर पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, हे सरकार फक्त सहा महिने टिकेल. यावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, “आम्ही पाच वर्ष यशस्वीपणे पुर्ण करुच त्याशिवाय पुढे पाचाचा पाढा म्हणत पुढचे १० – १५ – २० वर्ष आम्ही सत्तेत राहू.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -