घरमुंबईश्रमजीवी संघटनेचा प्रताप सरनाईक यांना पाठिंबा

श्रमजीवी संघटनेचा प्रताप सरनाईक यांना पाठिंबा

Subscribe

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. ठाणे आणि मीरा भाईंदरच्या जनतेचे प्रश्न ते तळमळीने व पोटतिडकीने मांडताना आणि ते प्रश्न सोडवून घेताना मी विधानसभेत त्यांना पाहिले आहे. मतदारसंघात त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेच्या विकासाची कामे केलेली आहेत. ठाणे आणि मीरा भाईंदरमधील आदिवासी पाड्यावरही त्यांनी कार्य केले आहे. प्रताप सरनाईक हे आदर्श लोकप्रतिनिधी असून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी ठाण्यात बोलताना केले.

ओवळा माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक यांना श्रमजीवी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. श्रमजीवी संघटनेच्या ठाणे आणि मीरा भाईंदरमधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची सभा ठाण्यात पार पडली. यात श्रमजीवींचे संस्थापक विवेक पंडित यांनी पाठींबा सरनाईक यांना जाहीर केला. पंडित यांनी लोकशाहीत मतदानाचे किती महत्व आहे हे सांगतानाच आमदार कशा पद्धतीने विधानसभेत कार्य करतात, जनतेने प्रत्येक लोकप्रतिनिधींना केलेल्या कामाचा अहवाल मागावा, असे आवाहन केले. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या कामाचा कार्य अहवाल जनतेला सादर केला याबद्दल त्यांनी कौतुक केले.

- Advertisement -

यावेळी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले कि, आपण आदिवासी बांधवांसाठीही गेल्या 10 वर्षात काम केले आहे. मीरा भाईंदर हद्दीत 500 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचे बांध काम सुरू झाले असून ते पुढील वर्षी पूर्ण होईल. दुसरे आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे हॉस्टेल ठाण्यात मंजूर झाले आहे. आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या भागात अनेक वर्षे न झालेल्या तीन स्मशानभूमीची कामे पूर्ण झाली आहेत. समाज मंदिरे झाली असून आदिवासी पाड्यावर आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत, असे सरनाईक म्हणाले.

पाड्यावर एखादे काम करण्यासाठी वनखाते परवानगी देत नाहीत. पण मतदारसंघातील 27 आदिवासी पाड्यावर 140 सोलर लाईट्स मी बसवल्या आहेत, असे सांगताच उपस्थित आदिवासी बांधवानी टाळ्यांचा कडकडाट केला. ठाणे येऊर आदिवासी पाडा येथे नवीन शाळा बांधून त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर आदिवासी महिलांसाठी हॉलही बनविण्यात आला आहे. अशी अनेक कामे आदिवासी बांधवासाठी केली असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत, इतर छोट्या मोठ्या नागरी समस्याही दूर केल्या जातील असे सरनाईक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -