घरमुंबईदाऊदच्या साम्राज्याला हादरवणारे उदयकुमार शिरुरकर रिंगणात

दाऊदच्या साम्राज्याला हादरवणारे उदयकुमार शिरुरकर रिंगणात

Subscribe

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून महापालिकेच्या बी विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून महापालिकेच्या बी विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी ‘डी’ विभाग कार्यालयाचे अभियंता राजेंद्र नरवणकर हे काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक झाले. त्यानंतर दाऊदच्या साम्राज्याला हादरवून टाकणारे डॅशिंग निवृत्त सहायक आयुक्त शिरुरकर मुंबादेवीमधून नशीब आजमावत आहेत. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार अमिन पटेल आणि महायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांना ते आव्हान देणार आहेत.

मुंबादेवीतून निवडणूक लढवणार

मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल निवडून येत आहेत. तिसर्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरून हॅट्ट्रिक करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. परंतु, आजवर भाजपकडे असलेला हा मतदारसंघ यंदा युतीमध्ये शिवसेनेला सोडण्यात आला. परंतु, १९९० ते २००४ पर्यंत या मतदारसंघातून भाजपचे राज पुरोहित निवडून आले होते. परंतु त्यानंतर राज पुरोहित हे कुलाबा मतदारसंघातून निवडून आले. यंदा या मतदारसंघातून पुरोहित यांचा पत्ता कापून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

१६ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबादेवी या मतदारसंघातून एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यातील महायुतीचे पांडुरंग सकपाळ, मनसेचे केशव मुळ्ये आणि अपक्ष उदयकुमार शिरुरकर हे वगळता उर्वरीत १३ उमेदवार हे मुस्लीम समाजाचे आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वबळावर जागा लढवल्या होत्या. त्यावेळी भाजपचे अतुल शहा हे दुसर्‍या स्थानावर तर शिवसेनेच्या युगंधरा साळेकर या चौथ्या स्थानावर फेकल्या गेल्या होत्या. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ अनुकूल असताना भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासाठी मुंबादेवी सोडून एकप्रकारे त्याग केला आहे. परंतु या मतदारसंघातून महापालिकेच्या बी वॉर्डाचे सहायक आयुक्त म्हणून काम करताना दाऊदसह अन्य गँगस्टरांशी संबंधित अनधिकृत बांधकामे तोडून टाकली होती. या भागातील अनेक गँगस्टरांना पुरुन उतरतानाच बांधकामेही जमीनदोस्त करणारे उदय शिरुरकर सेवानिवृत्त झाल्यानंतर याच विभागातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या भागाची संपूर्ण माहिती असलेल्या आणि प्रत्येकाला ओळखणार्‍या उदय शिरुरकर यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन नाही. तरी त्यांना विद्यमान आमदार अमिन पटेल आणि महायुतीचे पांडुरंग सकपाळ यांचे आव्हान आहे. त्यामुळे विभागात प्रसिद्ध असलेल्या शिरुरकर यांना या विभागातील मतदार स्वीकारुन विधानसभेत पाठवतात का, की महायुतीचे सकपाळ त्यांच्यासह सर्वांना रोखत विजयाची हॅट्ट्रिक अमिन पटेल करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


हेही वाचा – पालघरचे बंडखोर अमित घोडा पुन्हा शिवसेनेत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -