घरमहाराष्ट्रधक्कादायक! ५२२ औषध दुकाने फार्मासिस्ट विना

धक्कादायक! ५२२ औषध दुकाने फार्मासिस्ट विना

Subscribe

राज्यात ५२२ औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

कोणत्याही औषध दुकांनांमध्ये फार्मासिस्टची नेमणूक करणे बंधनकारक असून राज्यात ५२२ औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फार्मासिस्ट बाबतची ही माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वेबसाईटवरूनच देण्यात आली आहे. तसेच, ७९ फार्मासिस्ट एकाहून अधिक औषधांच्या दुकानांमध्ये अवैधरित्या काम करत असल्याची नोंदही करण्यात आली आहे.

७९ फार्मासिस्टची एकाहून अधिक दुकांनांमध्ये अवैध नोंद

राज्यात सव्वालाख नोंदणीधारक फार्मासिस्ट आहेत. यातील काही फार्मासिस्ट एकाहून अधिक औषध दुकानांमध्ये काम करत असल्याची माहिती एक्सलेन्स ऑफ एफडीए या अधिकृत वेबसाईटहून देण्यात आली आहे. एकाहून अधिक दुकानांमध्ये काम करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अन्न आणि औषध आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांना फूड अँण्ड ड्रग्ज लायन्सस होल्डर असोसिएशनकडून कळवले आहे.

नोंदणीकृत फार्मासिस्ट एकापेक्षा जास्त औषध दुकानांमध्ये काम करत असल्याचा मुद्दा त्या मागणी पत्रात मांडण्यात आला आहे. सध्या नोंदणी न केलेल्या फार्मासिस्टची संख्या वाढत आहे. ज्यांची नोंदणी केलेली नाही, असे फार्मासिस्ट कायद्याने अवैध मानले जात आहेत. हे बोगस फार्मासिस्ट औषधांच्या दुकानांमध्ये काम करु शकत नाहीत. पण, त्याचवेळी ७९ नोंदणीधारक फार्मासिस्ट एकाहून अधिक दुकानांमध्ये काम करत असल्याचे समोर येत आहे. यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन विभाग आयुक्तांकडे तक्रार केली असल्याचे फूड अँण्ड ड्रग्ज लायन्सस होल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले आहे. पण, अन्न व औषध प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, एखाद्या फार्मासिस्टने एखाद्या दुकानांतून नोकरी सोडल्यावर औषध दुकानात नोंदणी केलेले नाव कमी केले जात नाही. त्यामुळे, अशा फार्मासिस्टचे नाव एकाहून अधिक औषध दुकानात नोंद राहू शकते. नोंदणी नसलेल्या फार्मासिस्टची तक्रार राज्य फार्मसी काऊन्सिलकडे करावी, असे नोंदणीकृत फार्मासिस्टची संघटना महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -