घरमुंबईहितेंद्र ठाकूर यांचा पश्चिम पट्ट्यात झंझावाती दौरा

हितेंद्र ठाकूर यांचा पश्चिम पट्ट्यात झंझावाती दौरा

Subscribe

नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ,शेतकर्‍यांची साधला संवाद

वसई विधानसभेसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असलेले हितेंद्र ठाकूर यांनी वसईचा पश्चिम पट्टा पिंजून काढला. विकासाची झालेली कामे, नागरिकांच्या समस्यांयाविषयी माहिती घेतली व शेतकर्‍यांची संवाद साधला. यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. जवळपास 800 हून अधिक नागरिकांनी नाळा येथे शेतकरी संवादप्रसंगी उपस्थिती दर्शवली.

हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, डॉमनिक रुमाव, नगरसेवक मार्शल लोपीस, पंकज चोरघे यांच्यासह अन्य मंडळी यावेळी उपस्थित होती. भीमनगर, सत्पाळे, राजोडी, नवाळे, नाळा, उंबर गोठण, मुक्काम पाडा याठिकाणी हितेंद्र ठाकूर यांनी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या भागात विकास झाला नाही, अशी ओरड काहीजण करत आहेत. पंरतु नागरिकांना माहित आहे. त्यांच्या विभागात कामे झालेली आहेत. पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे आदी कामे करताना विविध योजना देखील राबविल्या आहेत. परिवहन सेवा देखील प्रवाशांना सुविधा देत आहे.

- Advertisement -

कृषी विभागासाठी वसई विरार शहर महापालिकेचा निधी आहे. वसई विधानसभेत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत उत्साह दिसत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हितेंद्र ठाकूर यांना आणि त्यांच्या विकासकामाला पसंती दिली जात आहे.

नाळे येथे नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. तर भीमनगर, सत्पाळे, राजोडी, नवाळे, शेतकरी संवाद, उंबर गोठण, मुक्कामपाडा या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांच्या धावत्या दौर्‍यात कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी त्यांची भेट घेतली व विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी गावात परिवहन सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. तर रस्ते , गटारे यासह मूलभूत सुविधांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. या वेळी नगरसेवक मार्शल लोपीस यांनी विभागातील विकास कामांसाठी आमदार फंडाचा झालेला वापर तथा महापालिकेची अर्थव्यवस्था व ग्रामीण विभागातील कर प्राप्तीतून विकास कामांची रक्कम वाढल्याचे शेतकर्‍यांना समजावून दिले. नागरिकांनी कोणतीही कामे घेऊन कधीही माझ्याकडे यावे, मी आधीही त्यांच्यासाठी उपलब्ध होतो, यापुढेही असेन असे हितेंद्र ठाकूर यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -