घरदेश-विदेश...आणि श्रीनगरचे विशेष पोलीस अधिक्षक ढसाढसा रडू लागले!

…आणि श्रीनगरचे विशेष पोलीस अधिक्षक ढसाढसा रडू लागले!

Subscribe

अरशद खान यांच्या कुटुंबावर अशी वेळ येईल,असे त्यांच्या कुटुंबियांना कधीच वाटले नव्हते.

श्रीनगर येथील एका पोलीस आधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनंतनाग येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक अरशद खान शहीद झाले. शहीद खान यांच्या अंतयात्रेत श्रीनगरचे विशेष पोलीस अधिक्षक हसीब मुगल अधिकच भावूक झाल्याचे दिसले. रविवारी ‘फादर्स डे’च्या दिवशी अरशद खान यांच्या मुलांच्या डोक्यावरुन वडिलांचा हात निसटला, अशी खंत मुगल यांनी व्यक्त केली.

अनंतनाग येथे बुधवारी पोलीस आणि दहशदवाद्यात चांगलीच चकमक झाली. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक अरशद खान शहीद झाले. सोमवारी अरशद खान यांचे शव त्यांच्या निवास स्थानी आणले. त्यावेळी श्रीनगरचे विशेष पोलीस अधिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पाहिले की, अरशद यांना २ लहान मुले आहेत. उहबान आणि दामिन असे दोघ भावंडाची नावे आहेत. महत्वाचे म्हणजे उहबान हा ४ वर्षाचा आहे, तर दामिन हा केवळ दीड वर्षाचा आहे. एवढ्या लहान वयातच उहबान याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आल्याचे पाहून हसीब मुगल उहबान याला घेऊन ढसाढसा रडू लागले. अरशद खान यांच्या कुटुंबावर अशी वेळ येईल,असे त्यांच्या कुटुंबियांना कधीच वाटले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -