घरमुंबईसर्व समाजघटकांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे शक्य नाही

सर्व समाजघटकांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे शक्य नाही

Subscribe

खासदार संभाजीराजे भोसले यांनी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटवर आमदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उस्मानाबादमधील देवळाली गावातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर खासदार संभाजी राजे भोसले यांनी आक्षेपार्ह ट्विट करत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देण्याविषयी म्हटले आहे. या आक्षेपार्ह ट्विटवर आमदार गिरीश महाजनांनी, सरसकट सर्व समाजघटकांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे शक्य नाही. संभाजीराजेंचे ‘ते’ वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया दिली.

संभाजीराजे भोसले यांनी उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळूनसुद्धा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. म्हणून अक्षयने आत्महत्या केली असल्याचे ट्विट केले. यापुढे त्यांनी, खड्ड्यात गेले आरक्षण! पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत द्या, असे आक्षेपार्ह ट्विट संभाजीराजे भोसले यांनी केले होते.

- Advertisement -

या आक्षेपार्ह ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान आमदार गिरीश महाजन यांनी संभाजी महाराजांचे ते वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया दिली.

संविधानाने आरक्षणाचे बंधन घातले आहे. त्या अनुषंगाने व्यवस्था चालते. समाजातल्या सर्व मागास घटकांना न्याय द्यायचा असतो. पण सरसकट सर्व घटकांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची खासदार संभाजी राजे यांची मागणी वैयक्तिक असू शकते.
आमदार गिरीश महाजन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -