घरमहाराष्ट्रसंत तुकाराम पालखी प्रस्थानासाठी देहू नगरी सज्ज!

संत तुकाराम पालखी प्रस्थानासाठी देहू नगरी सज्ज!

Subscribe

अभंगांनी देहूतील संत तुकामार महाराजांच्या मंदिराचा परिसर दुमदुमू लागला असून पालखी प्रस्थानासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट‘… वीणेकरी, टाळकरी यांची सर्वत्र लगबग दिसून येत आहे. अभंगांनी देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचा परिसर दुमदुमू लागला आहे. विठोबाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल होणार असून पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच पालखी प्रस्थानासाठी देहू नगरी सज्ज देखील झाली आहे.

देहू आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी सोमवारी दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे यांनी सांगितले आहे. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी रविवारी देहूत दाखल झाले आहे. त्यामुळे देऊळवाडा आणि इंद्रायणीचा नदीकाठ भाविकांनी फुलून गेला आहे. ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागसातासाठी विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या असून देहूनगरीत भाविकांननी अन्नदानासाठी मंडपही उभारले आहेत. आज पालखी प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होणार असून मंगळवारी सकाळी अनगडशहा बाबा येथे मानाची पहिली आरती होणार आहे. त्यानंतर पुढे पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने पालखी मार्गस्थ होईल. यावेळी लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात पुढे सरसावणार आहेत.

- Advertisement -

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

पालखी मंगळवारी देहू येथून मार्गस्थ होईपर्यंत चाकण – देहूफाटा, येलवाडी फाटा ड्रायव्हर ढाबा आणि भंडारा डोंगर पायथा रस्ता बंद असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याऐवजी तळेगाव – देहूरोड मार्गाचा वापर करावा. जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील देहूगाव कमान रस्त्याऐवजी देहूरोड – तळेगाव किंवा निगडी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच तळेगाव – देहूगाव जाणाऱ्या कॅनबे चौकाऐवजी देहू आळंदी रस्त्यावरुन कॅपजेमिनी चौक ते निघोजे एमआयडीसी रस्ता, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या मार्गाचा वापर करता येईल. त्याचप्रमाणे परंडवाल चौक ते देहू कमान ते भक्ती शक्ती चौकातून पालखी जाईपर्यंत जुना मुंबई – पुणे रस्त्यावरील सेंट्रल चौक रस्ता पहाटे तीनपासून बंद राहणार आहे. मुंबईकडून येणाऱ्या सर्व वाहतूक किवळे मार्गे कात्रज बायपास मार्गावर वळविली आहे. तर भक्ती शक्ती चौकातील रस्ता सकाळी सातपासून बंद राहणार आहे.


हेही वाचा – संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात पोलीस आयुक्तांची ‘अभंगवाणी’

- Advertisement -

हेही वाचा – ‘पालखी मुक्काम ठिकाणी मांसविक्री, दारु दुकानांवर बंदी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -