घरमहाराष्ट्रराज्यात एक वर्षात वाढले टीबीचे १७ हजार रुग्ण

राज्यात एक वर्षात वाढले टीबीचे १७ हजार रुग्ण

Subscribe

गेल्या एका वर्षात टीबीचे १७ हजार नवीन केसेस सापडल्या आहेत. यात ड्रग रजिस्टंट म्हणजे कोणत्याच औषधांचा फरक न पडणाऱ्या रुग्णांचाही समावेश आहे.

टीबी या आजाराच्या नियंत्रणाला घेऊन सरकारने आतापर्यंत अनेक दावे केले आहेत. तरीही, राज्यात टीबी रुग्णांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. संसदेतून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात टीबीचे १७ हजार नवीन केसेस सापडल्या आहेत. यात ड्रग रजिस्टंट म्हणजे कोणत्याच औषधांचा फरक न पडणाऱ्या रुग्णांचाही समावेश आहे. तर, सरकारकडून समोर आलेल्या नव्या रुग्णांच्या बाबतीत वेगळाच तर्क लावला जात आहे. वाढलेल्या निदान प्रक्रियेमुळे आणि राज्य सरकारद्वारे टीबी रुग्णांची लवकर ओळख पटण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे टीबीच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत.

टीबीमध्ये उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक

टीबी एक संसर्गजन्य आजार आहे. जो हवेतून एकाकडून दुसऱ्याला होऊ शकतो. या आजाराला गंभीरतेने घेत केंद्र सरकारने सर्व हॉस्पिटल्स आणि खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनाही टीबी रुग्णांची ओळख पटवून देण्याचे आदेश दिले आहेत. नुकतंच संसदेत देशभरातील टीबी रुग्णांची आकडेवारी सादर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये महाराष्ट्रात टीबीचे १ लाख ९२ हजार ४५८ रुग्ण आढळले होते. तर, २०१८ मध्ये यात १७ हजारांची भर होऊन २ लाख ०९ हजार ५७४ एवढी ही संख्या आहे. रुग्णांच्या संख्येच्या आधारित उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

- Advertisement -

देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात रुग्ण

टीबी आजारावर मुंबईत उत्तमोत्तम उपचार केले जातात. त्यामुळे, देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारांसाठी मुंबईत रुग्ण येतात. केसेसमध्ये झालेली वाढ ही कदाचित दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या रुग्णांमुळे होत असावी असं ही सांगण्यात आलं आहे.

“राज्यात निदान आणि उपचारांसाठी चांगल्या सुविधांच्या कारणांमुळे देशभरातून टीबीचे रुग्ण मुंबईत उपचारांसाठी येतात. याच कारणामुळे रुग्णांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी ‘जीत’ नावाचा एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या अंतर्गत ही केसेस शोधण्यास मदत होते.” – डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त, आरोग्य संचालनालय

दोन महिन्यात २१०० रुग्ण

खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या टीबी रुग्णांची नोंद करण्याची सुरुवात महाराष्ट्रात सर्वात आधी केली गेली. निदान आणि उपचार लवकर व्हावेत यासाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. टीबीचे आणखी केसेस समोर याव्यात यासाठी दरवर्षी तीन विशेष मोहिम घेतल्या जातात. यावर्षी एप्रिल महिन्यात घेतलेल्या विशेष मोहिमेत दोन महिन्यात २१०० टीबीचे नवे रुग्ण आढळले. या रुग्णांना टीबी आहे हे माहितही नव्हतं.

- Advertisement -

हेही वाचा – 

जागतिक क्षयरोग दिन – ‘त्याच्या’ टीबीवर औषधांची मात्रा होतेय निकामी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -