घरमहाराष्ट्रनितेश राणेंची दबंगगिरी; अधिकाऱ्याला घातली चिखलाची आंघोळ

नितेश राणेंची दबंगगिरी; अधिकाऱ्याला घातली चिखलाची आंघोळ

Subscribe

आमदार नितेश राणेंनी महामार्ग अधिकाऱ्याला चिखलाची आंघोळ घातली आहे.

आमदार नितेश राणे यांनी महामार्गाची पाहणी करताना रस्ते अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घातली आहे. यासोबतच राणे यांनी अभियंताला गडनदी पुलाला बांधले. महामार्ग सेवा रोड तुझा बाप बांधणार का? असा सवाल नितेश राणेंनी केला. मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांमुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यामुळे राणे यांनी अभित्यांची खबर घेतली. महामार्गावरील खड्ड्यांमुळे नितेश राणेंच्या रोषाला आज महामार्ग उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना सामोरे जावे लागले. आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले.

- Advertisement -

एवढेच नव्हे तर ‘सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करतोय तो तुम्ही पण आज अनुभवावा’, असे म्हणत आमदारांनी शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. तसेच संपूर्ण कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे सांगत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूल पर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांचे वस्तुस्थिती दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -