घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य-मंगळवार,९ जुलै २०१९

राशिभविष्य-मंगळवार,९ जुलै २०१९

Subscribe

मेष :- तुम्ही कुणाला विरोधी समजत नाही त्यामुळेच तुम्ही नेहमीच मोठे रहाता. नेहमीच मदतीचा हात पुढे करता. पण सावध रहा.
वृषभ :- आजचे काम उद्यावर जो टाकता नाही खरा धुर्त असतो. शहाणा असतो. कठीण काम करून घ्या.
मिथुन :- मौज-मजा कराल. आनंदाचा क्षण येईल. वास्तु, जमिन खरेदीचा विचार कराल.
कर्क :- वरिष्ठांचा सल्ला घ्या म्हणजे कोणताही निर्णय चुकणार नाही. हुशारी ठेवा संयम ठेवा.
सिंह :- धंद्यात फायदा होईल. बुद्धिचातुर्याने वादावर पडदा टकता येईल. स्पर्धेत जिंकाल.
कन्या :- मन स्थिर ठेवा. प्रगतीची संधी वेगळ्यावळणाने येऊ शकते. धंदा वाढेल.
तूळ :- विचारपूर्वक निर्णय घ्या. महत्त्वाची वस्तु घेण्याचे विसरू नका. वादाला महत्त्व देऊ नका.
वृश्चिक :- आजचे काम करून घ्या. नव्या विषयावर विचार करण्याची वेळ येईल. एकी ठेवा.
धनु :- विचारवंतांचा सल्ला घेता येईल. सहवासाने माणूस घडतो. वाद महत्त्वाचा नसतो.
मकर :- लोकांच्या वागण्याबोलण्याचा विचार करा. तुमचे धोरण तुम्हाला यावरून ठरवता येईल.
कुंभ :- प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. पोटाचा त्रास होऊ शकतो.
मीन :- घरातील माणसांच्या बरोबर वेळ घालवावा लागेल. पद मिळेल. धंद्यात फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -