घरक्रीडाभारत वर्ल्डकपमधून बाहेर; न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल

भारत वर्ल्डकपमधून बाहेर; न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल

Subscribe

भारताला वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला असून आता न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचली आहे.

संपूर्ण वर्ल्डकपमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेली भारतीय टीम आणि भारतीय बॅटिंग न्यूझीलंडसमोर ढेपाळली आणि भारताचा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये निराशाजनक पराभव झाला. पावसामुळे दोन दिवसांमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यामध्ये न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय टीम २२१ रनांवर ऑलआऊट झाली आणि भारताला वर्ल्डकपमधून बाहेर पडावं लागलं. बॅटिंग करताना भारताची टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांनी भारताचा डाव सावरला. मात्र, त्याला अंतिम स्वरूप देताना दोघांच्याही महत्त्वाच्या क्षणी विकेट पडल्यामुळे भारताला या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे.

याआधी मंगळवारी न्यूझीलंडची बॅटिंग सुरू असताना आलेल्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि आज राखीव दिवशी सामना तिथूनच पुढे सुरू करण्यात आला. न्यूझीलंडने ४६.१ ओव्हरमध्ये २११ रन केले होते. त्यानंतर आज खेळताना उरलेल्या ३.५ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने अजून २८ रनांची भर घालत स्कोअर २३९पर्यंत नेला.

- Advertisement -

विजयासाठी २४० रनांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताची टॉप ऑर्डर अक्षरश: ढेपाळली. अवध्या ९२ धावांमध्ये भारताचे ६ बॅट्समन तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. जडेजानं सकारात्मक खेळ करत ७७ धावा फटकावल्या. मात्र, २०८ धावा फलकावर असताना तो बाद झाला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये धोनी देखील ५० रन करून आऊट झाला. अखेरच्या षटकामध्ये भारताला ६ बॉलमध्ये २३ रन जिंकण्यासाठी आवश्यक होते. यामध्ये पहिल्या बॉलवर यजुवेंद्र चहलने चौकार मारला खरा. मात्र, पुढचा बॉल डॉट बॉल ठरला. आणि त्याच्याच पुढच्या बॉलवर चहलही बाद झाल्यामुळे सर्वबाद २२१ असा भारताचा स्कोअर झाला.

न्यूझीलंडने सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून बॉलिंग केली. त्याचा परिणाम म्हणून आमच्यावर दबाव टाकण्यात ते यशस्वी झाले. तुम्ही पूर्ण वर्ल्डकपमध्ये चांगला खेळ करता. पण जेव्हा नॉक आऊट परिस्थिती असते, तेव्हा कुणीही विजयी होऊ शकतं. अवघ्या ४५ मिनिटांमध्ये आख्खी मॅच फिरू शकते. आजही तेच झालं. खरंतर हा पूर्ण वर्ल्डकप आम्ही चांगला खेळ केला. त्यामुळे असा पराभव स्वीकार करणं खूप कठीण आहे. पण न्यूझीलंडनं सकाळी केलेली बॉलिंग आणि आम्ही निवडलेले चुकीचे फटके हे या पराभवासाठी कारणीभूत ठरेल असंच म्हणावं लागेल.

विराट कोहली, कर्णधार, भारतीय संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -