घरमुंबईभिवंडीतील वऱ्हाळा तलावाचा बांध धोकादायक

भिवंडीतील वऱ्हाळा तलावाचा बांध धोकादायक

Subscribe

भिवंडीतील वऱ्हाळा तलावावरील बांध धोकादायक बनला असून शासनाने तात्काळ दुरूस्ती न केल्यास तिवरे सारखी दुर्घटना घडू शकते अशी भीती भिवंडी महापालिकेतील भाजपा गटनेता निलेश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

तत्कालीन जुन्या भिवंडी शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी कामतघर येथील वऱ्हाळा देवी मंदिरालगत बनविण्यात आलेला वऱ्हाळा तलावाचा बांध वर्षानुवर्षे डागडूजी न झाल्याने धोकादायक झाला आहे. मुसळधार पावसात बांधावरून वाहणाऱ्या पाण्याचा जोर वाढल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. परिणामी त्या क्षेत्रातील भारत कॉलनी, चंदन बाग, भवानी नगर या परिसराला धोका निर्माण होऊन वित्त व जीवित हानी होण्याची भीती भिवंडी महापालिकेतील भाजपा गटनेता निलेश चौधरी यांनी आयुक्तांना पत्र देऊन व्यक्त केली आहे.

अन्यथा तिवरे सारखी घटना घडू शकते

सुमारे ५० वर्षांपूर्वी हा बांध बांधण्यात आला असून त्यामार्गे तलावातील पाणी साठवले जाते. आजही शहरातील जुन्या भागात या तलावातील दोन एमएलटी पाणी पिण्यासाठी वापरले जात असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने आजपर्यंत दुर्लक्षच केले. यातील पाणीसाठा अडविण्यासाठी कामतघर रस्त्याकडेला दगडी बांध घालण्यात आला. मात्र तो बांधही जीर्ण झाला असून प्रशासनाने बांधाच्या दुरूस्तीकडे कानाडोळा केला. सदरचा बांध हा कमकुवत झाला असून बांधाच्या दगडांच्या चिरांमधून पाणी झिरपत असल्याचे दिसून येत असल्याचे निलेश चौधरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात कोकणातील तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेचा उल्लेख करत वेळीच उपाययोजना न केल्यास या ठिकाणीही तशीच दुर्घटना घडू शकते, अशी भीतीसुद्धा निलेश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ

मुख्यमंत्र्यांनाही दिले निवेदन

विशेष म्हणजे आजपर्यंत या तलावाच्या बांधाचे स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा प्रशासनाकडून कधी केले गेले नसल्याचे धक्कादायक वास्तव निलेश चौधरी यांनी सर्वांपुढे आणले आहे. सध्या मुसळधार पावसाचे दिवस आहेत. या बांधावरून मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग होते. त्यामुळे सदरचा बांध अधिकच कमकुवत होणार असल्याने त्याबाबत तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असल्याची मागणी निलेश चौधरी यांनी निवेदनात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बाबतचे निवेदन पत्राद्वारे पाठवून भाजपा गटनेता निलेश चौधरी यांनी शासनाचे या बाबीकडे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -