घरमहाराष्ट्रपिरवाडी चौपाटीवर कचराच कचरा चहूकडे !

पिरवाडी चौपाटीवर कचराच कचरा चहूकडे !

Subscribe

अरबी समुद्रातील कचरा नागाव ग्रामपंचायत हद्दीतील पिरवाडी चौपाटीवर धडकणार्‍या लाटांच्या प्रवाहातून मोठ्या प्रमाणात कचरा चौपाटीवर येत आहे. या कचर्‍याच्या साम्राज्यामूळे चौपाटीचे विद्रुपीकरण झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण या ठिकाणाहून येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत.

उरण तालुक्यातील पिरवाडी चौपाटीवरील किनारा, येथील निसर्ग रम्य परिसर उरण तालुक्यातील नागरिकांबरोबर नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातील अबालवृद्धाना भूरळ घालतो. त्यामुळे दरदिवशी अनेक पर्यटकांची पावले येथील निसर्ग रम्य परिसराबरोबर पिरवाडी चौपाटीवर उसळणार्‍या, फेसाळणार्‍या लाटांचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी वळतात. हे पर्यटक आपल्या कुटुंबासह, मित्रांसह येथे गर्दी करत असतात. परंतु सध्या पावसाळ्यात समुद्रातील कचरा उसळणार्‍या लाटांच्या प्रवाहातून किनार्‍यावर येत आहे.

- Advertisement -

पिरवाडी चौपाटीवर पसरलेल्या कचर्‍याच्या साम्राज्यामुळे पर्यटकांच्या आनंदाचा विरस होत आहे. तरी नागाव ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, ओएनजीसी प्रकल्प यांनी पुढाकार घेऊन पिरवाडी चौपाटीवर पसरलेले कचरा हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या चौपाटीवर ये-जा करणारे पर्यटक, नागरीक करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -