घरदेश-विदेशमुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक

Subscribe

कुख्यात दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमधील पंजाबमधून अटक करण्यात आली आहे.

कुख्यात दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमधील पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. हाफिज सईदची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून ही अटक दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्यासंबंधी झाली आहे. हाफिज सईद लाहोरमधील गुजरावाला येथे जात असताना ही अटक पाकिस्तानी पोलिसांतर्फे करण्यात आली आहे. हाफिज सईदला यापूर्वीच आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. हाफिजची अटक ही भारताने टाकलेल्या दबाबाचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

२६/११ हल्ल्याचा सुत्रधार

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या १२ निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रकरणात सईदला अटक केल्याचे समजते. मात्र, मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. तसेच, काही महिन्यांपूर्वी त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यामुळे हाफिज सईदवरील ही कारवाई भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

काय म्हणाले उज्वल निकम

हे भारताच्या कुटनीतीचे यशस्वी पाऊल आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील जे पुरावे सादर केले त्यामुळे पाकिस्तानचा नाईलाज झाला आणि त्यांनी कारवाई केली. पण हे पाकिस्तानचे ढोंग वाटत आहे. त्यामुळे भारताने सावध राहिले पाहिजे. याचबरोबर, पाकिस्तान हाफिज सईदला अटक केल्याचे सांगत जगाची फसवणूक करत आहे. पण, ते न्यायालयात काय पुरावे सादर करतात आणि त्याला दोषी सिद्ध करण्यासाठी काय प्रयत्न करतात ते पहावे लागेल. अन्यथा हे नाटक आहे.

हेही वाचा –

‘आम्ही रक्ताशी बांधिल आहोत; तुमच्यातील भेसळ तपासून पाहा’

अवैध प्रवासी वाहतूक रोखताना चालकाची मारहाण, एसटी अधिकारी जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -