घरक्रीडाभारतीय हॉकीसाठी पुढील तीन महिने महत्त्वाचे -मनप्रीत

भारतीय हॉकीसाठी पुढील तीन महिने महत्त्वाचे -मनप्रीत

Subscribe

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेच्या पात्रतेच्या दृष्टिकोनातून भारतीय हॉकीसाठी पुढील तीन महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत, असे विधान भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने केले. भारतीय संघ सर्वात आधी जपानमध्ये १७ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या स्पर्धेत न्यूझीलंड, मलेशिया आणि यजमान जपानविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बेल्जियमच्या दौर्‍यावर जाईल. या सामन्यांमध्ये संघ म्हणून आमचे सर्वोत्तम खेळ करण्याचे लक्ष्य आहे, असे मनप्रीत म्हणाला.

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होणे हे आमचे ध्येय आहे. मात्र, ऑलिम्पिकचा विचार करून आम्हाला स्वतःवर दडपण आणायचे नाही. आम्ही फक्त प्रतिस्पर्धी संघाचा विचार करणार आहोत. पुढील काही महिन्यांत संघ म्हणून आमचे सर्वोत्तम खेळ करण्याचे लक्ष्य आहे. आम्हाला खूप मेहनत घ्यायची आहे आणि खेळात सुधारणा करायची आहे, असे मनप्रीतने सांगितले.

- Advertisement -

तसेच भारताचे नवे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्याबद्दल मनप्रीत म्हणाला, रीड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खेळात सुधारणा करत आहोत. आमचे प्रशिक्षक नसतानाही ते मागील काही काळात आमच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होते. आक्रमण आणि प्रतिहल्ला या आमच्या संघाच्या जमेच्या बाजू आहेत. त्यांनी आमच्या खेळण्याच्या पद्धतीत फारसा बदल केलेला नाही. आता आम्ही बचाव आणि संधीचे गोलमध्ये रूपांतर करणे या गोष्टी सुधारण्यावर भर देत आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -