घरटेक-वेकXiaomi चे Redmi K20 Pro आणि Redmi K20 स्मार्टफोन्स भारतात लाँच

Xiaomi चे Redmi K20 Pro आणि Redmi K20 स्मार्टफोन्स भारतात लाँच

Subscribe

काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या वनप्लसला देणार टक्कर

Xiaomi कंपनीने आपले दोन स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच केले आहेत. या स्मार्टफोनच्या मॉडेलचे नाव Redmi K20, Redmi K20 Pro असून टेक्नोसेव्ही गेल्या काही दिवसांपासून या Xiaomiच्या फोनची वाट पाहत असताना हे दोन स्मार्ट फोन लाँच करण्यात आले आहे.

- Advertisement -

किलर फ्लॅगशिप अंतर्गत हा फोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या वनप्लसला टक्कर देणार आहे हे नक्की. Xiaomi कंपनीनं आपला बहुप्रतीक्षित असा Redmi K20 Pro आणि Redmi K20 फोन लाँच केला आहे.

- Advertisement -

Redmi K20 आणि Redmi K20 Pro ची किंमत

हे दोन्ही स्मार्टफोन्स या वर्षी मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. Redmi K20 Pro या स्मार्ट फोनच्य़ा ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज असणाऱ्या फोनची किंमत २७,९९९ रुपये तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज असणाऱ्या फोनची किंमत ३०, ९९९ रुपये इतकी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स ग्राहकांना २२ जुलैच्या दुपारी १२ वाजल्यापासून MI.COM आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे.

Redmi K20 Pro चे फिचर्स

  • ६.३९ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले
  • २० मेगापिक्सेल पॉप अप सेल्फी कॅमेरा
  • ४८ मेगापिक्सेल कॅमेरा
  • ८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि १३ मेगापिक्सेल वाइड अँगल सेन्सॉर
  • २० मेगा पिक्सेल पॉपअप सेल्फी
  • ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज
  • ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज

Redmi K20 चे फिचर्स

  • ६.३९ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले
  •  क्वालकॉम न्यू स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर
  •  ४८ मेगापिक्सेल कॅमेरा
  •  २० मेगा पिक्सेल पॉपअप सेल्फी
  • ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोअरेज
  • ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -