घरमुंबईपोलीस कुटुंबियांचा धोकादायक घर सोडण्यास नकार

पोलीस कुटुंबियांचा धोकादायक घर सोडण्यास नकार

Subscribe

मुंबई उपनगरातील नेहरू नगर पोलीस वसाहत या ठिकाणी असलेल्या दोन इमारती म्हाडाकडून धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यासाठी म्हाडाने या दोन्ही इमारतींना नोटीस जारी करून ८ दिवसांत इमारत रिकामी करण्याचे आदेश म्हाडाकडून देण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यत आम्ही घर सोडणार नसल्याचे येथील पोलीस कुटुंबाचे म्हणणे आहे.

इमारत कोसळण्याची भिती

कुर्ला पूर्व नेहरू नगर पोलीस वसाहत येथील इमारत क्रमांक १३५ आणि १३७ या दोन्ही इमारतीत एकूण ८० खोल्या असून या दोन्ही इमारतीत सध्या ४९ पोलीस कर्मचारी कुटुंब वास्तव्यास आहे. या दोन्ही इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, या इमारतीचे सज्जे, तसेच भीतीना भेगा पडलेल्या असून कुठल्याही क्षणी ही इमारत कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दीड वर्षांपूर्वी या दोन्ही इमारती म्हाडाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जानेवारी २०१९ मध्ये या दोन्ही इमारतीचे स्ट्रुक्चर ऑडिट करण्यात आले होते, त्यावेळी ऑडिट करणाऱ्या कंपनीकडून ही इमारत डागडुजी करण्याच्या स्थितीत असल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे.

- Advertisement -

विजपाणी बंद करण्याचा म्हाडाचा इशारा 

२९ जुलै रोजी म्हाडाने इमारत क्रमांक १३५ आणि १३७ या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे. येत्या आठ दिवसात या दोन्ही इमारती खाली करण्यात याव्या, अन्यथा या इमारतीतील विजपाणी बंद करण्याचा इशारा म्हाडा कडून देण्यात आलेला आहे. याबाबत या इमारतीत राहणाऱ्या पोलीस कुटुंबाशी चर्चा केली असता आमची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही घरे सोडणार नसल्याचा पवित्रा येथे राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांनी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -