घरमहाराष्ट्रनेरळमध्ये वीज बिल भरणे ठरतेय डोकेदुखी

नेरळमध्ये वीज बिल भरणे ठरतेय डोकेदुखी

Subscribe

येथील परिसरात तारखेच्या नंतर बिल येत असल्याने आणि ते भरण्यासाठी सध्या एकच ठिकाण उपलब्ध असल्याने तासन्तास पावसाचा, तर कधी ऊन्हाचा मारा सहन करून ग्राहक बिल भरण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. आधीच वाढीव बिल येत असल्याने डोकदुखी, तर बिल भरण्यासाठी खूप वेळ रांगेत उभे राहावे लागल्याने पायदुखी, अशी ग्राहकांची अवस्था झाली आहे.

गावाचे शहरीकरण झपाट्याने झाल्यामुळे महावितरणची दोन कार्यालये आहेत. त्यात बिल भरण्याची सुविधा अपुरी आहे. जागृती नागरी सहकारी बँक व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महावितरणची बिले भरण्याची सुविधा होती. मात्र काही कारणाने ‘जागृती’ची शाखा बंद झाली आणि बिलांचा भार जिल्हा बँकेवर आला. त्याच दरम्यान पाडा विभागात कर्नाळा सहकारी बँक सुरू झाली आणि तिथेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली. महावितरणचे ग्राहक आनंदले. जास्त वेळ रांगेत थांबावे लागणार नाही अशी त्यांची समजूत झाली असताना सुरूवातीच्या काळात तेथे इंटरनेट अनेकवेळा बंद पडत असल्याने जास्त वेळ बिल भरलेच जात नव्हते. नंतर ती समस्या सुटल्यानंतर कर्नाळा बँकेत बिल भरले जाऊ लागले तर जिल्हा बँकेत इंटरनेट समस्या उद्भवली आहे.

- Advertisement -

नेरळ येथे दोन विद्युत बिल भरणा केंद्रे आहेत. ग्राहकांची गर्दी लक्षात घेता आम्ही संबंधित बँकेला उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच नेरळ येथील महावितरण कार्यालयात डिजिटल पद्धतीने बिल भरण्यासाठी सोय केली जाणार आहे. या व्यतिरिक्त नेरळ परिसरात नागरी पतसंस्थेचे उत्पन्न उपलब्ध झाल्यास ग्राहकांसाठी तेथे बिल भरण्याची सुविधा केली जाईल.
-आनंद घुले, उप अभियंता, महावितरण, कर्जत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -