घरमुंबईमनपा रुग्णालयाच्या लिपिकाला लाचप्रकरणी अटक

मनपा रुग्णालयाच्या लिपिकाला लाचप्रकरणी अटक

Subscribe

नागपाडा येथील कामाठीपुरा परिसरातील आय रुग्णालयाच्या एका लिपिकाला सात हजार रुपयांची लाचेची मागणी परून पाच हजार रुपयांचा हप्ता घेताना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. धोंडीराम शंकरराव बंडगर असे या 40 वर्षांच्या लिपिकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार आय रुग्णालयातील कर्मचारी असून त्यांचे गेल्या चार महिन्यांचे पगार काढण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांनी संबंधित कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, अर्जानंतरही त्यांचा पगार काढण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांनी लिपिक धोंडीराम बंडगर यांची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांच्याकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांचा पगार काढणार नाही, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला पाच हजार रुपये देण्याचे मान्य करून त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्‍यांनी गुरुवारी आय रुग्णालयात साध्या वेशात सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना धोंडीराम बंडगर याला पोलिसांनी अटक केली. रुग्णालयात झालेल्या या कारवाईमुळे तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -