घरमहाराष्ट्रनाशिक‘सिव्हिल’मुळे वाचले दीड हजार अपघातग्रस्त

‘सिव्हिल’मुळे वाचले दीड हजार अपघातग्रस्त

Subscribe

सिव्हीलमधील वैद्यकीय अधिकार्‍यांनी जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत १ हजार ४१३ अपघातग्रस्तांचे जीव वाचवले

सरकारी रुग्णालये म्हटले की, दुरवस्था, निष्काळजीपणा व उदासीनता, असा समज अनेकांचा आहे. मात्र, यास नाशिक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अपवाद आहेत. वैद्यकीय अधिकार्‍यांनी जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत १ हजार ४१३ अपघातग्रस्तांचे जीव वाचवले आहेत.

वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्यामुळे जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. जानेवारी ते जून २०१९ या महिन्यांत १४३२ वाहनचालकांचे गंभीर अपघात झाले आहेत. अपघाताग्रस्तांना वेळेत जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी अनुभव व कौशल्याने उपचार करत १४१३ जणांचे जीव वाचवले. बेशिस्त दुचाकी व चारचाकींवर नजर ठेवली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे अपघाताच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी आल्यावर जखमींना उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अनुभव व कौशल्याने जखमींवर उपचार केल्याने १ हजार ४१३ जणांचे जीव वाचले आहेत.

- Advertisement -

अनुभवी अधिकाऱ्यांमुळे शक्य

जिल्ह्यात आरोग्य विभागाची उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये आहेत. प्रथम या ठिकाणी अपघातग्रस्तांवर उपचार केले जातात. त्यात गंभीर अपघातग्रस्त असतील तर त्यांना ‘सिव्हिल’मध्ये आणले जाते. येथे अनुभवी वैद्यकीय अधिकारी असल्याने हजारो अपघातग्रस्तांचे आजवर जीव वाचण्यात यश आले आहे.- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

तीन महिन्यांतील आकडेवारी अशी… (कंसात मृत)

जानेवारी – 419 (2)
फेब्रुवारी – 124 (1)
मार्च – 148 (1)
एप्रिल – 222 (12)
मे – 278 (3)
जून – 241
एकूण – 1,432 (19)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -