घरमहा @२८८अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४०

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४०

Subscribe

१४० क्रमांकाचा अंबरनाथ मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे.

मुंबई शेजारचं मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेलं शहर म्हणजे अंबरनाथ. देशभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक कंपन्या या अंबरनाथच्याच. कंपन्या आहेत म्हणून कामगाराचं शहर ही अंबरनाथची ओळख, एकेकाळी शिवसेनेचे एकमेव मुस्लीम नेते असलेल्या साबीर शेख यांचा हा मतदारसंघ. मतदारसंघ फेररचनेनंतर राखीव झालेला हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेचा गड बनला असून १४० क्रमांकाचा अंबरनाथ मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३१० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती


मतदारांची संख्या –

पुरुष – ,८६,४१५

- Advertisement -

महिला – , ५७,७२५

एकूण मतदार – ,४४,१५५


विद्यमान आमदार – डॉ. बालाजी किणीकर

डॉ. बालाजी किणीकर हे शिवसेना पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ४७ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखेडे यांना४४ हजार ९५९ मत पडली होती. त्यामुळे डॉ. बालाजी किणीकर यांचा २ हजार ४१ मतांनी विजय झाला आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना ४७,०००
  • राजेश वानखेडे, भाजप ४४,९५९
  • कमलाकर सूर्यवंशी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १५, ७४०
  • महेश तपासे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ८, ७२२
  • डॉ. विकास कांबळे, मनसे , १२९


नोटा – ९३

मतदानाची टक्केवारी – ३९.७१


हेही वाचा – कल्याण लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -