घरमहाराष्ट्रनाशिक१६ हजार नवमतदारांचीविशेष मोहीमेत नोंदणी

१६ हजार नवमतदारांचीविशेष मोहीमेत नोंदणी

Subscribe

जिल्ह्यातील १५ तालुक्यांत मतदान केंद्रावर राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक जागरूक मतदारांनी केंद्रावर येऊन मतदार यादीत नाव आहे की नाही याची खातरजमा केली. तसेच अनेकांनी नाव नोंदणीसाठी अर्जही सादर केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मतदार जनजागृती अभियानात १६ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. तर नावात दुरूस्ती करणे, पत्ता बदल याकरीताही अर्ज प्राप्त झाले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

या मोहिमेंतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करणे, दुबार, मयत मतदारांची नावे वगळणे, नावात बदल, पत्ता बदल यासारख्या दुरुस्त्या करण्याकरीता १५ जुलै ते ३० जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत फॉर्म ६ नाव नोंदणी, फॉर्म ७ नाव कमी करणे फॉर्म ८ नावात दुरुस्ती, फॉर्म ८ अ पत्ता बदल याकरता एकूण २८ हजार ८१८ अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक अर्ज नवीन नाव नोंदणीसाठी प्राप्त झाले तर दुबार, मयत मतदारांचे नाव कमी करणे याकरता ८८५२ अर्ज प्राप्त झाले. नावात दुरुस्तीसाठी ३११३ तर पत्ता बदलसाठी ७५८ अर्ज प्राप्त झाल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.

- Advertisement -

तालुकानिहाय प्राप्त अर्ज

नांदगाव १६३९, मालेगाव मध्य ७९७, मालेगाव बाहय ७१३, बागलाण १३७५, कळवण १०६७, चांदवड ७६९, येवला १३२८, सिन्नर २१७०, निफाड ८६७, दिंडोरी २४४१, नाशिक पूर्व ६१३, नाशिक मध्य ९६६, नाशिक पश्चिम ५९८, देवळाली २५०, इगतपुरी ५०२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -