घरमहा @२८८कुर्ला विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १७४

कुर्ला विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७४

Subscribe

कुर्ला (विधानसभा क्र. १७४) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

सुरुवातीपासूनच या मतदारसंघातल्या मतदारांनी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना कौल दिला आहे. कधी इथे काँग्रेसचे उमेदवार जिंकतात, तर कधी शिवसेनेचे, तर कधी अपक्षांची देखील लॉटरी लागते. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाची सद्दी या मतदारसंघात राहिलेली नाही. विशेषत: २००८मध्ये पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानंतर देखील इथल्या मतदारांनी उमेदवारांना नेहमीच संभ्रमात ठेवलं आहे. निम्नवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय मतदारांचीच संख्या इथे अधिक आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेली अनधिकृत बांधकामं आणि राजकारणात अडकलेली नेतेमंडळी यांच्यामुळे या भागाचा नागरी विकास रखडल्याचंच चित्र आहे. या मतदारसंघात एकूण २८० मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती


मतदारांची संख्या

पुरुष – १,६३,५७३
महिला – १,२६,९०६

- Advertisement -

एकूण मतदार – २,९०,४८४


Mangesh Kudalkar
मंगेश कुडाळकर

विद्यमान आमदार – मंगेश कुडाळकर, शिवसेना

सुरुवातीपासूनच कट्टर शिवसैनिक असलेले मंगेश कुडाळकर यांनी पक्षांतर्गत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. २०१४मध्ये पहिल्यांदाच कुडाळकर थेट विधानसभेवर निवडून आले. मतदारसंघात अनधिकृत बांधकामांना अटकाव करता न येणं आणि नागरी विकास घडवून आणण्यात अपयश येणं या बाबी त्यांच्याबद्दल प्रामुख्याने सांगितल्या जातात. कुर्ल्यातल्या नवीन सहकार नगरमधील म्हाडाच्या भूखंडावर अनधिकृत बांधकामं होण्यात त्यांचा सहभाग असल्याचे आरोप २०१८मध्ये करण्यात आले होते.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मंगेश कुडाळकर, शिवसेना – ४१,५८०
२) विजय कांबळे, भाजप – २८,९०१
३) अविनाश बारवे, एमआयएम – २५,७४१
४) मिलिंद कांबळे, राष्ट्रवादी – १४,१९४
५) स्नेहल जाधव, मनसे – ५५२९

नोटा – ११९५

मतदानाची टक्केवारी – ४६.१२ %


हेही वाचा – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -