घरमहा @२८८राजापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २६७

राजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६७

Subscribe

सबटायटल - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (विधानसभा क्र. २६७) विधानसभा मतदारसंघ आहे.

राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे. शिवाजी राजाच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे.राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे.


मतदारसंघ क्रमांक – २६७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १०,७३,३८
महिला – १२,६८,२१

- Advertisement -

एकूण मतदार – २३,४१,५९


 

विद्यमान आमदार राजन साळवी ,शिवसेना
राजन साळवी हे शिवसेनेचे राजापूरचे आमदार आहेत. २००९ आणि २०१४ साली ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य होते. नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. राजापूर शिवसेना आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाणार रिफायनरीचे बॅनर फाडले आहेत. राजापूर एस्टी स्थानकावर रिफायनरीचे हे बॅनर लावण्यात आले होते. पण रिफायनरीच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक होत त्यांनी हे बॅनर फाडले आहेत. रिफायनरी रद्द झालीच पाहिजे अशी घोषणा यावेळी देण्यात आली.


 

पहिले पाच उमेदवार

१. राजन साळवी,शिवसेना – ७६२६६
२. राजेंद्र देसाई, काँग्रेस- ३७२०४
३. अजित रमेश यशवंतराव,राष्ट्रवादी- ११९२३
४. संजय यादव- भाजपा- ९९५३
५. आनंद कांबळे,बसपा – २१९३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -