घरक्रीडाविराटमध्ये माझ्या छटा दिसतात!

विराटमध्ये माझ्या छटा दिसतात!

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बर्‍याचदा मुलाखती देताना दिसतो. मात्र, यावेळी विराटलाच एका महान खेळाडूची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याआधी विराटने ‘बीसीसीआय टीव्ही’साठी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव रिचर्ड्स यांची मुलाखत घेतली.

तुम्ही नेहमी हेल्मेट न घालताच फलंदाजी करायचात. त्यावेळी खेळपट्ट्याही तितक्याशा चांगल्या नव्हत्या आणि उसळी घेणारे चेंडू टाकण्यावर कोणत्याही मर्यादा नव्हत्या. मात्र, तरीही तुम्ही गोलंदाजांची धुलाई करायचात. खेळपट्टीवर असताना तुम्ही नक्की काय विचार करायचात?, असा प्रश्न विराटने विचारला.

- Advertisement -

त्याचे उत्तर देताना रिचर्ड्स म्हणाले, माझा स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास होता. गोलंदाजाने उसळी घेणारे चेंडू टाकले, तर जखम होऊ शकते हे फलंदाजाने गृहीत धरले पाहिजे. मात्र, चेंडू लागल्यानंतर तुम्ही कसे पुनरागमन करता हे जास्त महत्त्वाचे असते. मी हेल्मेट घालायचा प्रयत्न केला, पण त्यात खेळताना मला अडचण जाणवायची. वेस्ट इंडिजची टोपी घालून खेळणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. मी नेहमीच माझा नैसर्गिक खेळ करायचो. कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध धावा करण्याचा मला आत्मविश्वास होता. माझ्यात आणि तुझ्यात बर्‍याच समान गोष्टी आहेत. काही वेळा मलाही लोक म्हणायचे की, तू कशासाठी इतका रागावला आहे?

रिचर्ड्स यांनी याआधीही विराटाचे कौतुक केले आहे. विराट ज्याप्रकारे फलंदाजी करतो, ते पाहून मला स्वतःच्या फलंदाजीची आठवण होते, असे ते म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -