घरक्रीडाअर्जेंटिना विश्वचषकाबाहेर गेल्यामुळे 'त्याने' केली आत्महत्या

अर्जेंटिना विश्वचषकाबाहेर गेल्यामुळे ‘त्याने’ केली आत्महत्या

Subscribe

अर्जेंटिना संघांच्या विश्वचषकाबाहेर जाण्याचा पश्चिम बंगालमधील तरूणाने धसका घेऊन चक्क आत्महत्या केली आहे.

शनिवारी झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात फ्रान्सकडून अर्जेंटिनाचा ४-३ अशा फरकाने पराभव झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेर १ गोल कमी असल्यामुळे अर्जेंटिनाला पराभव स्वीकारावा लागला. अर्जेंटिनाच्या पराभवाने कर्णधार मेस्सीचे यावर्षी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले ज्याचा धसका जगभरातील सर्व मेस्सी फॅन्सने घेतला. मात्र पश्चिम बंगालच्या २० वर्षीय तरूणाने थेट आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मंतोश हलदर असे या तरूणाचे नाव असून तो पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील छत्तीयनगच्ची गावात रहात होता. त्याच्या वडिलांनी टेलीग्राफला माहिती देताना सांगितले की, मंतोश एक कट्टर फुटबॉल प्रेमी असून तो मॅराडोना आणि अर्जेंटिनाचा फॅन होता. तो आपला बहुतेक वेळ फुटबॉल पाहण्यात आणि खेळण्यात घालवत असे. शनिवारी रात्री झालेल्या अर्जेंटिनाच्या पराभवामुळे तो खूप नाराज झाला. तो आमच्याशी काही न बोलताच झोपला, नंतर सकाळी आम्ही त्याला त्याच्या खोलीत लटकलेले पाहिले.

- Advertisement -
messi vs france
फ्रान्सविरूद्ध अर्जेंटिना सामन्यातील एक क्षण

स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनंतर त्यांनी सांगितलेकी “मृत मंतोशच्या कुटुंबीयांसोबत आम्ही बोललो, त्याने त्याचा आवडता संघ अर्जेंटिनाच्या पराभवामुळेच निराश होऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.”
मेस्सीच्या पराभवाचे टेन्शन घेऊन आत्महत्या करण्याची ही भारतातील पहिलीच वेळ नसून यापूर्वीही केरळमधील दिनू अलेक्स या ३० वर्षीय तरूणाने मेस्सीचा संघ अर्जेंटिनाच्या क्रोएशियाकडून ३-० च्या पराभवाचा धसका घेत आत्महत्या केली होती.

वाचा- पराभव अर्जेंटिनाचा, टेन्शन केरळमध्ये; युवकाची आत्महत्या?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -