घरदेश-विदेशजामिनासाठी शशी थरुर यांची पतियाळा कोर्टात धाव

जामिनासाठी शशी थरुर यांची पतियाळा कोर्टात धाव

Subscribe

शशी थरुर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दिल्लीच्या पतियाळा कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

सुंनदा पुष्कर हत्या प्रकरणातील आरोपी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी दिल्लीच्या पतियाळा कोर्टात धाव घेतली आहे. शशी थरुर यांना भीती आहे की, सात जुलैच्या सुनावणीनंतर त्यांना अटक केले जाईल. त्यामुळे त्यांनी पतियाला कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. २०१४ मध्ये शशी थरुर यांच्या पत्नी सुंनदा पुष्कर यांनी दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी थरुर यांची कसून तपासणी केली. शशी थरुर यांनीच आपल्या पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी तपासात केला होता. त्याचबरोबर सीबीआयच्या विशेष कोर्टाने देखील शशी थरुर यांनाच आरोपी असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे शशी थरुर यांना कलम ४९८ ‘अ’ अंतर्गत शिक्षा होऊ शकते.

आरोपपत्रात कवितेचाही समावेश

सुंनंदा पुष्कर यांनी ८ जानेवारी २०१८ रोजी आपल्या पतीला पाठवलेल्या इमेलमध्ये लिहिले होते की, ‘माझी जीवन जगण्याची इच्छा नाही. मला मरणाची आस लागली आहे. मी मरणाची वाट बघत आहे’. या ईमेलनंतर ९ दिवसांनी सुनंदा दिल्लीच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडल्या होत्या. सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘सुनंदाचे शशी थरुर यांच्यासोबत तिसरे लग्न होते. या लग्नाला ३ वर्ष ३ महिने पुर्ण झाली होती. आरोपपत्रात ‘अबेटमेंट फॉर सुसाई़ड’ आणि ‘क्रुएल्टी’चा समावेश करण्यात आला आहे. या आरोपपत्रात पोलिसांनी सुनंदाच्या त्या कविताचाही समावेश केला आहे, जी कविता आत्महत्येच्या दोन दिवस अगोदर लिहिली होती’.

- Advertisement -

तीन ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते

शशी थरुर यांच्या विरोधात कलम ४९८ ‘अ’ (क्रुरता) आणि ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अशी कलमे दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे थरुर यांना कलम ४९८ ‘अ’ आणि ३०६ नुसार तीन ते दहा वर्षांच्या करावासाची शिक्षा होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -