घरमनोरंजन'या' मालिकांमध्येही होणार गणरायाचे आगमन!

‘या’ मालिकांमध्येही होणार गणरायाचे आगमन!

Subscribe

आज, गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत आणि विविध सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याचप्रमाणे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या मालिकांमधील कुटुंबांमध्येही बाप्पा विराजमान झाले आहेत. मराठी मालिकांमध्ये प्रामुख्याने सर्व सण साजरे केले जातात. तसाच सर्वांचा लाडका गणेशोत्सवदेखील सर्वत्र आनंदाने साजरा केला जात आहे. सध्या छोट्या पडद्यावर मराठी वाहिन्यांची संख्यादेखील वाढली आहे. त्यातील बहुतांश मालिका या प्रेक्षकांच्या पसंतील उतरल्या आहेत. याच मालिकांमध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना येत्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या मालिकांमध्ये बाप्पाचे आगमन 

सध्या कलर्स मराठीवर सुरु असलेल्या लोकप्रिय जीव झाला येडापिसा या मालिकेत गणपतीचे आगमन होत आहे. वाजत-गात गणपतीची मिरवणूक काढली गेली असून त्याची प्रतिष्ठापना केली जात आहे. तर घाडगे अँड सून मालिकेतही गणराया विराजमान झालेले येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय सोनी मराठीवरील ह. म. बने तु. म. बने या कौटुंबिक मालिकेत इको फ्रेंडली शाडूच्या मातीचा बाप्पा सर्व बने कुटुंबिय मिळून साकारणार आहेत. तर त्याच बाप्पाची प्रतिष्ठापना घरामध्ये केली जाणार आहे. याच वाहिनीवर आणखी एक मालिका एक होती राजकन्या मध्ये त्यांच्या पोलीस ठाण्यात पोलीसाच्या रुपातील बाप्पा विराजमान होणार आहे. स्टार प्रवाहवरील मोलकरीण बाई या मालिकेत गणेशोत्सवानिमित्त सोसायटीमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. तर झी मराठीवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या हे देखील येत्या आठवड्यात गणपती बाप्पा स्पेशल एपिसोड सादर करणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरदेखील गणरायाचे दर्शन आणि उत्सवाची झलक पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -