घरमहाराष्ट्रनिर्विघ्नं कुरू मे देव...

निर्विघ्नं कुरू मे देव…

Subscribe

गणेशोत्सवासाठी 40 हजार पोलिस तैनात

गणेशोत्सवआणि मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळी येत असल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सणादरम्यान कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गणरायाच्या आगमनासाठी शहरात 40 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, 10 सप्टेंबरला मोहरमचा सण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवात लालबागच्या राजाला असलेली गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी लालबागच्या राजासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. यासाठी तीन ते साडेतीन हजार पोलीस तैनात आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीला सशस्त्र दलाचे जवान, होमगार्ड, वाहतूक रक्षक, जलसुरक्षा दलाचे जवान, एसआरपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफचे जवान, वाहतूक पोलिसांचे साडेतीन ते चार हजार पोलीस कर्मचारी आणि सहा ते साडेसहा हजाराहून स्वयंसेवक सज्ज आहेत.

- Advertisement -

शहरातील अतिसंदेवनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान काही मार्गात बदल करण्यात आले असून, काही रस्ते बंद ठेवले तर काही ठिकाणी एक दिशा मार्ग ठेवण्यात आले आहेत. 13 ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, गर्दीच्या ठिकाणी वाहने उभी करण्यावर बंदी आहे.

गणपती विसर्जनासाठी घेतलेल्या वाहनांची तपासणी करा, तसेच वाहनचालकांना शक्यतो गाडी सोडून जाण्यास सांगू नये. त्यासाठी गणेश भक्तांनी मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच महिला भक्तांच्या रांगेसाठी महिला कार्यकर्त्यांना तैनात करण्याचे आदेश पोलिसांनी मंडळांना दिले आहेत.

- Advertisement -

पोलिसांवर संकटमोचनाची जबाबदारी

दहशतवादी हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी क्युआरटीच्या पथकांसह मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाच्या कर्मचार्‍यांना तैनात केले आहे. तसेच गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी अभिलेखावरील गुन्हेगार विरोधात तडीपारी, हद्दपारी, नोटीस बजावणे अशा विविध कलमांखाली प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवात सामाजिक तंटे निर्माण होऊ म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल नेवटर्किंग साईटवरुन समाज कंटक भडकावू संदेश पसरवू शकतात. तरुण वर्गाने याला बळी न पडता शांतता राखावी, तसेच गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, क्राईम फ्रन्ट अशा विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आल्याचे पोलिसांनी सांगितले.

लालबागच्या राजासाठी विशेष सुरक्षा
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजासाठी यंदाही विशेष पोलीस सुरक्षा पुरवली आहे. येथे 10 पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 59 सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, 500 हून अधिक पोलीस अंमलदार, राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी, 20 डीएफएमडी, 50 एचएचएमडी, दोन सीसीटीव्ही व्हॅन आणि चार कॉम्बॅक्ट व्हॅन आदी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -