घरगणेशोत्सव २०१९अभिजित खांडकेकरने दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

अभिजित खांडकेकरने दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

Subscribe

अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने भरपूर काही मिळाले आहे आणि इथून पुढेही मिळत राहो.

टीव्ही सिरियलच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेता अभिजित खांडकेकर याने नाशिकच्या आपल्या घरी कागदापासून आकर्षक आरास करत गणेशभक्तांना पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश दिला आहे. मुंबईतील रोजच्या व्यस्त वेळेतून निवांत झालेल्या अभिजितने पत्नी सुखदासोबत घरात गणेशाची स्थापना केली आहे.

बाप्पाच्या मनात असले की काही मागची आवश्यकताच नसते, तो भरभरून देत असतो. आम्ही तीन वर्षापासून काम करत आहोत आणि या काळात काही चित्रपट संगीत नाटके देखील केली. यामध्ये बाप्पाच्या आशीर्वादाने भरपूर काही मिळाले आहे आणि इथून पुढेही मिळत राहो. हा उत्सव सर्वांनी साधेपणाने आणि अतिउत्साह टाळून करायला पाहिजे असा संदेश त्याने आपलं महानगर सोबत बोलताना दिला.

- Advertisement -

अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या घरातील देखावा

आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजित खांडकेकर याने आपल्या घरात पर्यावरणपूरक देखावा साकारत श्रींची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2, 2019

आरास तयार करताना कार्डबोर्ड़च्या माध्यमातून या दोघांनी सुबक बाप्पांना शोभेल असं आकर्षक रंगबिरंगी फुलाची रचना केली असून, बाप्पांचे आसन म्हणून कमळाचं फुल साकारलं आहे. बाप्पांच्या मागे मोरपीस आणि गणेशाला प्रिय जास्वंदाच्या फुलाचीही आकर्षक रचना केली आहे. अभिजितच्या या पर्यावरणपूरक देखाव्याच्या माध्यातून त्याने आपल्या फॉलोअर्सलादेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचेही आवाहन त्याने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -