घरमुंबई'या' नियमांचे पालन करूनच करा बाप्पाचे विसर्जन

‘या’ नियमांचे पालन करूनच करा बाप्पाचे विसर्जन

Subscribe

बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन

गणेशचतुर्थीच्या दिवशी वाजत-गाजत बाप्पांचे घरो-घरी आणि सार्वजनिक मंडळात स्वागत तर केले. मात्र आता सर्व गणेश भक्तांना वेध लागले ते म्हणजे बाप्पाला निरोप देण्याचे. या गणेश विसर्जनाच्या वेळी कोणतेही गैर प्रकार घडू नये किंवा गैरसोय होऊ नये याकरिता गणपतींचे शिस्तबद्ध विसर्जन व्हावे याकरिता बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने विसर्जनासाठी प्राथमिक नियमावली तयार करण्यात आहे. या नियमावलीत बाप्पांच्या विसर्जनासाठी समुद्रात भरतीच्या वेळी विसर्जन न करता ओहोटीची वेळ असेल त्या वेळातच विसर्जन करावे, असे सांगण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकीसंदर्भात नियमावली जाहीर

  • यासह उंच गणेशमुर्ती असल्यास त्या मार्गात असणारे उड्डाण पूल आणि मेट्रोची कामे तपासून मिरवणूक सोहळ्याता मार्ग निश्चित करावा
  • गणेश मंडळाच्य़ा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सूचनाचे पालन करुन निश्चित केलेल्या मार्गावरून मिरवणूकींचे मार्गक्रमण करावे.
  • मिरवणूकींचे मार्गक्रमण करताना बाप्पांची उंची बघून मिरवणुकीदरम्यान जागो-जागी असणाऱ्या ओव्हरहेड वायरला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • विसर्जनाच्या वेळी खबरदारी घेत खोल पाण्यात जाऊ नये. चौपाटी आणि विसर्जनाच्या जागी मूर्तीचे वाहन सोडल्यास इतर वाहनं नेऊ नये.
  • विसर्जन मिरवणुकीत कोणतेही व्यसन करून सहभागी होऊ नये.

वरील सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरिश वालावलकर यांनी केले आहे.

- Advertisement -

बाप्पांचे विसर्जन निःशुल्क

विसर्जन करण्याच्या ठिकाणी कोणीही पैशाची मागणी केल्यास पैसे देऊ नये. मुर्ती विसर्जनाकरिता पालिकेकडून केलेली व्यवस्था निःशुल्क असल्याचे या नियमावलीत बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -