घरदेश-विदेशपाकिस्तानात हिंदू मुलीची गळा आवळून हत्या

पाकिस्तानात हिंदू मुलीची गळा आवळून हत्या

Subscribe

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्याची माहिती वारंवार समोर येत असते. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचार होण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या घोतकी भागात डेंटल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका हिंदू मुलीची रस्सीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. मात्र, कॉलेज प्रशासनाने या हत्येस आत्महत्या म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कॉलेजच्या एका हिंदू शिक्षकाने ईशनिंदा केल्याचा कथित आरोप करण्यात आला. या आरोपाने घोतकी येथील वातावरण गरम झाले. कट्टरतावाद्यांनी घोतकी येथील शाळांची आणि हिंदू मंदिरांची तोडफोड केली. त्यानंतर डेंटल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका हिंदू मुलीची हत्या करण्यात आली.


हेही वाचा – Video: सैनिकांच्या मृतदेहासाठी पाकिस्तानी लष्कराने फडकावले पांढरे झेंडे

- Advertisement -

 

मोबाईलही गायब, पोलिसांनी शोधून काढला

नमृता चंदानी असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. मंगळवारी तिचा मृतदेह अंथरुणावर पडलेला मिळाला. या मुलीने आत्महत्या केल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, नमृताच्या मानेवर दोरीचे व्रण उमटले आहेत. याशिवाय तिचा मोबाईल देखील मिळाला नाही. त्यानंतर बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी मोबाईल शोधून काढला. त्याचबरोबर मुलीने आत्महत्या केली तर तिचा मृतदेह अंथरुणावर कसा मिळला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -