घरदेश-विदेशजन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर

जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर

Subscribe

एक दिवसीय गुजरात दौऱ्यची सुरवात मोदी यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया भागात असलेल्या 'स्टॅचू ऑफ युनिटी ' परिसरास भेट देऊन केली

६९ व्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या एक दिवसीय गुजरात दौऱ्यची सुरवात मोदी यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया भागात असलेल्या ‘स्टॅचू ऑफ युनिटी ‘ परिसरास भेट देऊन केली. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री विजय रूपाणी, उप मुख्यमंत्री नितीन पटेल आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

सगळ्यात पहिले मोदी यांनी केवाडिया परिसरात विकसित होत असलेल्या खानवनी इको-टुरीझम उद्यानास भेट दिली आणि त्या भागात होत असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर मोदी यांनी कॅक्टस पार्कला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमनांतर मोदी यांनी खास ई-रिक्षातून जंगल सफारीचा आनंद घेतला तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या बटरफ्लाय पार्कचे निरीक्षण केले.

- Advertisement -

याप्रसंगी मोदींच्या हस्ते फुलपाखरांना परिसरात सोडण्यात आले. यानंतर मोदी यांनी सरदार सरोवर धरणाची पाहणी केली तसेच नर्मदा नदीची पूजा देखील केली.

गुजरात राज्यात विक्रमी पाऊस पडल्याने सरदार सरोवर पाण्याने भरला असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्याच प्रमाणे ‘स्टॅचू ऑफ युनिटी ‘ परिसरास सुद्धा मोठ्या प्रमाणात देशातून नव्हे तर जगभरातून नागरिक भेट देत आहे. गेल्याच महिन्यात स्टॅचू ऑफ युनिटी परिसरात पंचवीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिल्याचे समजते. या विक्रमाची दाखल आंतरराष्ट्रीय टाईम मासिकाने सुद्धा घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांचे सोमवारी अहमदाबाद येथे आगमन झाले. यावेळी सामान्य नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लाडक्या ‘ नरेंद्र भाईंचे ‘ जंगी स्वागत देखील केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -