घरमुंबईअंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत केली जनजागृती

अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत केली जनजागृती

Subscribe

महाराष्ट्र शासनाने स्वच्छता मोहिमे अंतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती अंबरनाथमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

अंबरनाथमधील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविली. यात १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि इतर मान्यवर सामील झाले होते. महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमे अंतर्गत अंबरनाथमधील शाळांमध्ये १७ आणि १८ सप्टेंबर रोजी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तर १९ सप्टेंबर रोजी शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

१५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

या रॅलीमध्ये १५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळांचे शिक्षक, प्रभागाचे ब्रँड अम्बॅसेडरही यामध्ये सहभागी झाले होते. तर महात्मा गांधी, एमआयसीईएस, न्यू डेक्कन या शाळांची एक संयुक्त रॅलीही आयोजित करण्यात आली होती. नगर परिषद कार्यालय-मार्केट परिसर-सिंधी गल्ली-बांगडी गल्ली-स्टेशन परिसर, असे मार्गक्रमण करण्यात आले.

- Advertisement -

नक्की वाचाकेडीएमसीचे ३५ कोटी खड्ड्यात… खड्ड्याची मलई कुणाच्या घशात?

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती

या रॅलीत नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, मुख्याधिकारी देविदास पवार, नगर परिषदेचे ब्रँड अम्बॅसेडर सलील जव्हेरी, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश पाटील, स्वच्छता निरिक्षक सुहास सावंत, संकेत थोरात, गीतांजली शास्त्री आदी उपस्थित होते. शहर स्वच्छता, प्लास्टिक बंदी, प्लॅस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम, घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण, घंटागाडीचा वापर, प्लॅस्टिक तसेच कचरा निर्माण करणाऱ्यांवर होणारी दंडात्मक कारवाई इत्यादीबाबतचे बॅनर्स, हँडबोर्ड्स हाती घेऊन तसेच उद्घोषणा करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

हेही वाचा…म्हणून कांदा सर्वसामान्यांना रडवतोय!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -