घरमनोरंजनअण्णा आता शेवंताचा काटा काढणार?

अण्णा आता शेवंताचा काटा काढणार?

Subscribe

रात्रीस खेळ चाले या मालिकेला आता वेगळं वळणं आलं आहे. अण्णा आणि शेवंताच्या अनैतिक संबंधाबद्दल खुलासा झाला आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका एका नवीन वळणावर आली आहे. या लोकप्रिय मालिकेमध्ये नेहमी आश्चर्यचकित करणारे कथानक समोर येत असतात. सध्या मालिकेमध्ये शेवंता आणि अण्णा यांच्या अनैतिक नात्याबद्दल पाटणकरला सर्व काही कळलं आहे. याच कारणामुळे शेवंताचा नवरा हा घर सोडून जातो. या मालिकेच्या पहिल्या पर्वात शेवंताच्या खूनाने कथानक सुरू होताना दाखवले होते. मात्र पोलिसांना शेवंताच्या खुनाबाबत कोणताही पुरावा मिळतं नाही. सध्या मालिकेमध्ये शेवंता आपल्या नवऱ्याच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण तिचा हा प्रयत्न असफल झाला आहे. याचे कारण अण्णा नाईक याने शेवंता खून केला आहे, अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु आहे. यामुळे अण्णा शेवंताची केमिस्ट्री पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा Video: ‘बिग बॉस’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सलमान भडकला; म्हणाला ‘…तर माझ्यावर बहिष्कार टाका’

कालच्या एपिसोडमध्ये शेवंता नवऱ्याच्या आठवणीत रडताना बसली आहे, असं दाखवण्यात आलं आहे. मात्र तितक्यातचं अण्णा नाईक हा शेवतांच्या घरी येतो. त्यावेळी अण्णा आणि शेवंतामधील संभाषण शेवंताचा नवरा ऐकतो. सुशीला ही पाटणकरची मुलगी नसून अण्णाची मुलगी आहे हे शेवंताच्या नवऱ्याला कळतं. हे कळल्यामुळे शेवंताचा पती अक्षरशः वेडा झाला. शेवंताचा नवरा या सर्व प्रकाराचा जाब अण्णांना विचारतो. मात्र, अण्णा त्याला उडवून लावतो. त्यामुळे या मालिकेत आगामी एपिसोडमध्ये शेवंताचा नवरा आत्महत्या करतो हे निश्चित आहे.

- Advertisement -

हेही वाचा ‘फत्तेशिकस्त’ मध्ये साकारणार ‘येसाजी कंक’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -