घरमनोरंजनVideo: …तर माझ्यावर बहिष्कार टाका; 'बिग बॉस'च्या इव्हेंटमध्ये भडकला सलमान

Video: …तर माझ्यावर बहिष्कार टाका; ‘बिग बॉस’च्या इव्हेंटमध्ये भडकला सलमान

Subscribe

‘माझ्यामुळे येथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्रास होत आहे ना, मग एक काम करा माझ्यावर बहिष्कार टाका'

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध असणारा ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचे १३वा सीजन सुरू होत आहे. सोमवारी मुंबईमध्ये या शोचा लॉन्चिंग इव्हेंट पार पडला. या सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खान फोटोग्राफर्सवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या इव्हेंटमध्ये फोटोग्राफर सतत सलमानचे फोटो काढत असल्यामुळे आणि होणाऱ्या आवाजामुळे या लॉन्चिंग कार्यक्रमामध्ये व्यत्यय येत होतो. याच कारणासाठी सलमान भडकल्याचे सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर माझ्यावर बहिष्कार टाका, असे देखील वक्तव्यही सलमानने रागाच्या भरात केले आहे.


हेही वाचा- Video: दमदार अभिनय असलेला ‘सांड की आंख’ चा ट्रेलर लाँच

यानंतर शोच्या कॉर्डिनेटरच्या मदतीने हा वाद, गोंधळ संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र फोटोग्राफर्स फोटो काढण्याचे काही थांबवत नव्हते. त्यामुळे हे संपूर्ण वातावरण बघून सलमान फोटोग्राफरवर भडकला. ‘माझ्यामुळे येथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्रास होत आहे ना, मग एक काम करा माझ्यावर बहिष्कार टाका ‘, असे रागामध्ये सलमान बोलून गेला.

- Advertisement -

एवढं सांगून देखील फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढतच राहिले. यामुळे सलमान खान अजूनच संतापला. बघा हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ…

- Advertisement -

या इव्हेंटचे कॉर्डिनेटर मीडियाच्या फोटोग्राफर्सना समझवताना देखील दिसत आहेत. यावेळी सलमान सोबत स्टेजवर मीषा पटेल, सना खान, पूजा बनर्जी, अर्जुन बिजलानी देखील उपस्थित होते.

हेही वाचा ऐका राखी सावंत सांगते लग्नानंतरच्या व्यथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -